घरमनोरंजनसई ताम्हणकरची 'स्टँडअप कॉमेडी'त एन्ट्री

सई ताम्हणकरची ‘स्टँडअप कॉमेडी’त एन्ट्री

Subscribe

अभिनय क्षेत्राकडे येण्यापूर्वी नवे कलाकार स्टँडअप कॉमेडी क्षेत्राकडे वळतात. या क्षेत्रात आपले नाव कमवल्यानंतर ते अभिनय क्षेत्राकडे वळतात. मात्र सई ताम्हणकर आता स्टँडअप कॉमेडी करणार आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी नव-नवे ट्रेंड्स घेऊन येत असते. बाकी स्टार्स जे करत नाही, ते काहीतरी वेगळं करण्याचा विचार सई ताम्हणकर नेहमी करत असते. मालिका-चित्रपटाचे क्षेत्र पदाक्रांत केल्यावर सईने एक कुस्ती टीम खरेदी केली. त्यानंतर ती आता लवकरच एका वेबसीरिजमधूनही दिसणार आहे. आता नवी वाट शोधायची हॅट्रिक मारत सई तिसरी नवी गोष्ट करतेय ती म्हणजे स्टॅंड-अप कॉमेडी. आतापर्यंत स्टँडअप कॉमेडी क्षेत्रामध्ये कोणी सुपरस्टारने प्रवेश केला नव्हता. अभिनय क्षेत्राकडे येण्यापूर्वी नवे कलाकार स्टँडअप कॉमेडी क्षेत्राकडे वळतात. या क्षेत्रात आपले नाव कमवल्यानंतर ते अभिनय क्षेत्राकडे वळतात. पण सई ताम्हणकरचे हेच तर वैशिष्ट्य आहे. तिला नाविन्याची ओढ असल्यामुळे ती काहीतरी नवीन करायचा विचार करते.

- Advertisement -

सई ताम्हणकरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नुकताच एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओच्या माध्यामातून सई आपल्या नव्या स्टँडअप कॉमेडीच्या प्रयोगाची माहिती चाहत्यांना देत आहे. याबद्दल सईने असे सांगितले आहे की, “मला स्टॅंडअप कॉमेडियन्सबद्दल आणि या क्षेत्राबद्दल खूप आदर आहे. मी माझ्या करीयरमध्ये काही कॉमेडी सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. पण स्टँडअप कॉमेडी खूप वेगळी असते. आणि रंगमंचावर लाइव अभिनय करण्याची नशा काही औरच असते. म्हणून हा नवा अनुभव घेऊन पाहायचाय.” रविवारी संध्याकाळी ठाण्यामध्ये सई ताम्हणकर आपला पहिला स्टॅडअप कॉमेडी शो करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -