म्हणून वैतागलेल्या सैफअली खानने केली पोलिसात तक्रार?

तैमूर जिथे जिथे जातो तिथे फोटोग्राफर्स त्याचा पिच्छा सोडत नाहीत. सुरुवातीला या प्रसिद्धीची गंमत वाटली असली तरी आता मात्र सैफ चांगलाच हैरान झाला आहे. त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार केल्याची चर्चा होत आहे.

Mumbai
म्हणून वैतागलेल्या सैफअली खानने केली पोलिसात तक्रार?

बॉलिवूड विश्वात पदार्पण करण्याआधीच सैफ अली खान आणि करिना कपूर पेक्षा अधिक प्रसिद्धी मिळाली आहे, ती त्यांच्या मुलाला म्हणजेच, तैमूर अली खान. तैमूर जिथे जिथे जातो तिथे फोटोग्राफर्स त्याचा पिच्छा सोडत नाहीत. सुरुवातीला या प्रसिद्धीची गंमत वाटली असली तरी आता मात्र सैफ चांगलाच हैरान झाला आहे. त्यामुळे त्याने पोलिसांत तक्रार केल्याची चर्चा होत आहे.

 

View this post on Instagram

 

Why so cute baccha?😍🥺💞💙 #taimuralikhan

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

तैमूरच्या लाखो चाहत्यांसाठी फोटोग्राफर्सची फौज तैमूरच्या आसपासच फिरकत असतात. यामुळे सैफ आणि करिनाच्या घराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना ही याचा त्रास होत आहे. नुकतेच, फोटोग्राफर्संना त्याच्या घराजवळून हटवण्यासाठी पोलिसांची टीम देखील पोहचली होती. सैफच्या घराबाहेर सतत असलेल्या फोटोग्राफर्सच्या वेढ्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे पोलिसांनी फोटोग्राफर्सना तिथून हटवायला सुरुवात केली. यावेळी सैफ तैमूरसह तिथून बाहेर पडत होता. त्यामुळे ही तक्रार त्यानेच केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

 

View this post on Instagram

 

How adorable 🤤❤️ |#taimuralikhan #kareenakapoor #saifalikhan |

A post shared by Taimur Ali Khan Pataudi 👼💋 (@taimuralikhanx) on

DNA च्या वृत्तानूसार, सैफ तैमूरवर पडणाऱ्या कॅमेऱ्यांच्या फ्लॅशलाईट्समुळे वैतागला होता. या फ्लॅशलाईट्सचा दुष्परिणाम त्याच्या डोळ्यावर होईल या भीतीने सैफ फोटोग्राफर्सवर वैतागला होता. तैमूरचे सारखे फोटोस काढणाऱ्या फोटोग्राफर्सना रागात असे ही बोलला की, ”बस करा, नाहीतर माझा मुलगा अंधाळा होईल.” अशा शब्दांत त्याने रागही व्यक्त केला होता. या फोटोग्राफर्सच्या त्रासाला कंटाळून या विरोधात सैफने पोलिसात तक्रार केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here