घरमनोरंजनसैफ अली खानच्या पटौडी पॅलेसची सफर

सैफ अली खानच्या पटौडी पॅलेसची सफर

Subscribe

सैफच्या ८०० कोटींच्या पटौडी पॅलेस बद्दल बरंच काही.

अभिनेता सैफ अली खान हा अभिनेत्याबरोबरच नवाब देखील आहे. त्याचा पटौडी पॅलेसची ही चाहत्यांमध्ये चर्चा आहे. हाच पटौडीपॅलेस आता सैफने विकत घेतला आहे.आज जाणून घेऊन सैफच्या ८०० कोटींच्या पटौडी पॅलेस बद्दल बरंच काही.

- Advertisement -

अभिनेता सैफ अली खानचा पटौडी पॅलेस खुप प्रसिद्ध आहे. पटौडी नवाब परिवारामुळे सैफ अली खानचे पटौडी पॅलेसचे खुप जवळचे संबंध आहेत. या जागेबद्दल कायमच सैफच्या चाहत्यांना उत्सुकता असते. सैफ अली खान आणि परिवार सुट्टीच्या दिवशी अनेकदा पॅलेसला भेट देत असतात. तैमुरचा बर्थडे ही इथेच सेलिब्रिट केला होता.

- Advertisement -

पटौडी भारतातील हरियाणा राज्यातील गुरूग्राममधील अलिशान राजवाडा आहे. या पॅलेसला इब्राहिम कोठी म्हणूनही ओळखले जाते. क्रिकेटर मंसूर अली आणि अभिनेत्री शर्मिला टगोर यांचा मुलगा सैफ अली खान. सैफने त्याच्या कमाईतून पतौडी पॅलेस पुन्हा विकत घेतला आहे. अशी चर्चा रंगत आहे. सैफचे आजोबा हे ८ वे नवाब होते त्यांनी हा पॅलेस सैफच्या वडिलांना वारसा म्हणून दिल होतं. सैफचे वडिल हे पटौडीचे शेवटचे नवाब होते.

काय आहे पटौदी पॅलेस आणि सैफचा संबंध?

सैफच्या आजोबांनी १०० वर्षांपूर्वी सैफच्या आजीसाठी हा राजवाडा बांधला होता. तेव्हा ते तिथले राज्यसमम्राट होते. परंतु त्यांची ही पदवी थोड्या काळात संपली. त्याच्या वडिलांनी तो राजवाडा फ्रान्सिस आणि अमन यांना भाड्याने दिला. त्यांनी या पॅलेसची योग्य देखभाल केली. २०११ साली सैफचे वडिल मंसूर अली खान यांचे निधन झाले.

आता वारसाप्रमाणे राजवाडा सैफच्या ताब्यात आला.तेव्हा राजवाड्याचा काही भाग सैफने भाड्याने दिला.  फ्रान्सिस सैफला सांगितले की तुला पटौडी पॅलेस हवा असेल तर तू मला सांग तू पॅलेस परत घे. पण त्या पॅलेसची किंमत मोजवी लागेल. त्याप्रमाणे आता सैफने त्याच्या पैशांतून हा पटौडी पॅलेस पुन्हा विकत घेतला आहे.

या पॅलेसचे आणि सैफचे काही भावनिक संबंध आहेत.सैफची आई शर्मिला टगोर हिला नेहमीच पटौडी पॅलेसमध्ये रहायला आवडते. त्याचप्रमाणे सैफच्या वडिलांनाचे दफन ही याच पॅलेसच्या आवारात करण्यात आले आहे. लहानपणी सैफने या जागेत आपले बालपण काढले आहे. त्यामुळे सैफची या जागेशी खुप भावनिक गुंतागुंत आहे.

पटौडी पॅलेसची रचना १९००च्या दशकाच्या सुरूवातीला झाली आहे. रॉबर्ट टोर रसेल यांनी पॅलेसच डिझाइनिंग केलं होतं. या पॅलास मध्ये खउप मोठा कॉरिडोर आहे. तसचं रॉयल रूम आलिशान हॉल पुरातन वस्तू अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बंगल्यात मोठं लॉन आहे शिवाय व्हिक्टोरीअन कारंजे आहे.

तब्बल १० एकरावर हा पॅलेस उभारण्यात आला आहे. पटौडी पॅलेसमध्ये एकून १५० खोल्या आहेत.ज्यामध्ये ७ ड्रेसिंग रूम,७ बाथरूम,७ बिलियर्ड रूम आणि डायनिंग रूम आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -