घरमनोरंजनसायना नेहवालने बायोपिककरता परिणीती चोप्राला दिल्या 'अशा' शुभेच्छा!

सायना नेहवालने बायोपिककरता परिणीती चोप्राला दिल्या ‘अशा’ शुभेच्छा!

Subscribe

सायनाने या चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्यापुर्वी संपुर्ण चित्रपटाच्या टीमला दिल्या शुभेच्छा

बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये अभिनय करताना बॉलिवूड विश्वातील अभिनेत्री सायना नेहवाल ही सायनाच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेकरिता परिणीती गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मेहनत घेत असून लवकरच परिणीती सायनाच्या भूमिकेत चाहत्यांना लवकरच मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची शुटिंग ११ ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून सायनाने या चित्रपटाचे शुटिंग सुरू होण्यापुर्वी संपुर्ण चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बायोपिकसाठी अभिनेत्री परिणीतीने आपले लक्ष पुर्णपणे सायना आणि तिच्या खेळाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी केद्रींत केले आहे. याकरिता तिने तासन् तास बॅडमिंटनच्या कोर्टमध्ये आपला घाम गाळत सराव करत आहे. परिणीतीचे ट्रेनिंग लवकरत संपणार आहे.

- Advertisement -

बायोपिककरिता सायनाच्या विशेष शुभेच्छा

सोमवारी सायनाने सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून परिणीती आणि या बायोपिकच्या संपुर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना असे म्हटले की, ‘या बायोपिकच्या संपुर्ण प्रवासात मी सोबत असेन, चित्रपटाच्या टीमला माझ्या खूप शुभेच्छा!’

- Advertisement -

नुकतेच परिणीती चोप्राने आपल्या ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या चित्रपटाची शुटिंग संपवून लंडनहून भारतात परतली आहे. भारतात आल्यानंतर परिणीतीने बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकची तयारी सुरू केली आहे. याकरिता परिणीती चांगलीच मेहनत घेताना दिसतेय. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच परिणीतीने या बायोपीकची तयारी आणि मेहनत सुरू असतानाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. हे फोटो शेअर करताना ‘Verified Me. All day everyday nowadays?’ असे कॅप्शन दिले आहे.

View this post on Instagram

Me. All day everyday nowadays?

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on


सायनाच्या बायोपिकसाठी परिणीतीची सुरू आहे जय्यत तयारी; शेअर केले फोटो
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -