घरमनोरंजनसखी-सुव्रतचं कपल गोल... गोंदवला सारखाच टॅटू!

सखी-सुव्रतचं कपल गोल… गोंदवला सारखाच टॅटू!

Subscribe

वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीने नुकताच कपल गोल ठरवत सारखाच टॅटू गोंदवला आहे.

दिल दोस्ती दुनियादारी फेम जोडी सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ही जोडी चर्चेत आलीय ती त्यांनी गोंदवलेल्या टॅटूमुळे. वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकलेल्या या जोडीने नुकताच कपल गोल ठरवत सारखाच टॅटू गोंदवला आहे. दरम्यान सखीने सोशल मीडियावर टॅटूचे फोटो शेअर केले आहेत.

सखी गोखले आणि सुव्रत जोशी हे दोघे वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर दोघेही लाँग डिस्टंट रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. सध्या सखी उच्च शिक्षणाच्या निमित्ताने लंडनमध्ये राहत आहे. तर सुव्रतचे वास्तव्य मुंबई-पुणे येथे असते. दरम्यान सध्या सखी ख्रिसमसच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं भारतात परतली आहे. दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवत असून सखी आणि सुव्रत दोघांनीही या दिवसात टॅटू गोंदवून घेतला आहे. दोघांनीही गोंदवलेला टॅटू सारखाच असून सखीने या टॅटूचा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

- Advertisement -

काय आहे टॅटूमध्ये?

सुव्रतने त्याच्या डाव्या हातावर तर सखीने तिच्या मानेखाली, पाठीवर टॅटू गोंदवला आहे. नक्षत्र, दिवस-रात्र, युनिव्हर्स यांचं प्रतिक असा हा टॅटू आहे. यापूर्वी सखीने चार टॅटू गोंदवले असून सखीचा हा पाचवा टॅटू आहे. पहिल्या टॅटूद्वारे सखीने फुलपाखरू गोंदवलं. त्यानंतरच्या दुसऱ्या टॅटूमध्ये तिच्या आईचं नाव आहे. तर तिसऱ्या टॅटूमध्य उडणारे पक्षी असून चौथा टॅटू तिच्या शाळेचा आहे.

View this post on Instagram

=] ?

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -