घरमनोरंजनप्रियांका बनली क्वीन तर सलमान बनला बॉलीवूड किंग

प्रियांका बनली क्वीन तर सलमान बनला बॉलीवूड किंग

Subscribe

सलमान खान आणि प्रियांका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आली आहे. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियांकाच २०१८ मधले सर्वाधिक चर्चित कलाकार ठरले आहेत.

सलमान खान आणि प्रियांका चोप्रा जोनासच्यासाठी स्कोर ट्रेंड्सकडून नव्या वर्षात एक गोड बातमी आलीय. नुकत्याच आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अहवालातून हे सिध्द झालंय की, सलमान आणि प्रियांकाच २०१८ मधले सर्वाधिक चर्चित कलाकार होते. १ जानेवरी २०१८ पासून ३१ डिसेंबर २०१८ ह्या संपूर्ण वर्षाच्या आलेल्या आकडेवारीनूसार, सर्वाधिक आठवडे नंबर १ स्थानावर राहिलेले सलमान आणि प्रियांका २०१८ सालातले ‘बॉलीवूड ट्रेंडसेटर’ ठरलेत. गेल्या वर्षभरात (१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ ह्या कालावधीत) स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्टवर सुपरस्टार सलमान खान ५२ आठवड्यांपैकी २४ आठवडे तर प्रियांका २० आठवडे नंबर वन स्थानी विराजमान असल्याने दोघेही सर्वाधिक लोकप्रिय बॉलीवूड कलाकार असल्याचे दिसून येते आहे. अमेरिकेतील मीडिया टेक कंपनी स्कोर ट्रेन्ड्स इंडियाव्दारे ही प्रमाणित आणि संशोधित आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

२०१८मध्ये राहिले चर्चेत

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “प्रियांका आणि सलमान दोघेही २०१८ ह्या संपूर्ण वर्षभरात सातत्याने बातम्यांच्या मथळ्यांमध्ये राहिले. सलमानचे विवाद असोत की, कोर्टाचे खटले किंवा मग त्याचे सिनेमे असोत. तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक कारणांमूळे वर्तमानपत्रांमध्ये आणि सोशल मीडियावर दिसत होता. तिच गोष्ट प्रियांका चोप्राचीही निक जोनाससोबतच्या प्रियांकाच्या अफेअरपासून ते त्यांच्या लग्नापर्यंत प्रियांका सातत्याने बातम्यांमध्ये होती. आणि त्याच कारणास्तव तिच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. म्हणूनच प्रियांका आणि सलमान दोघांचाही लोकप्रियतेत इतर बॉलीवूड कलाकारांवर वरचष्मा दिसून येतोय.“

- Advertisement -

अश्वनी कौल पूढे सांगतात, “आम्ही १४ भारतीय भाषांमधील ६०० हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -