घरताज्या घडामोडी'मुळशी पॅटर्न'च्या रिमेकसाठी सलमानने सुचवले आयुषचे नाव

‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकसाठी सलमानने सुचवले आयुषचे नाव

Subscribe

पिंकविला या वृत्तवाहिनीच्या माहिती नुसार बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान हा एका मराठी सिनेमाचा रिमेक करत असल्याचे सांगितले आहे. अभिनेता सलमान खान हा 'मुळशी पॅटर्न' या मराठी सिनेमाचा रिमेक करणार असल्याची चर्चा आहे.

सलमान खानने २०१८ मध्ये  रोम -कॉम लव्ह यात्री  हा सिनेमा आयुष शर्मा सोबत केला होता. यानंतर आता पुन्हा यानंतर पुन्हा एकदा दोघे एकत्रित दिसणार आहे. पिंकविला या वृत्तवाहिनीच्या माहिती नुसार बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान हा एका मराठी सिनेमाचा रिमेक करत असल्याचे सांगितले आहे. अभिनेता सलमान खान हा ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी सिनेमाचा रिमेक करणार असल्याची चर्चा आहे.

View this post on Instagram

Subah ki coffee aur sooraj!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

 

सलमान आणि अरबाझसाठी स्पेशल स्क्रिनींग 

मराठी सिनेमा मुळशी पॅटर्न हा २०१८ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचे स्क्रिनींग दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सलमान आणि अरबाझसाठी खास वेगळे ठेवले होते. दोघांनाही या सिनेमा आवडला होता यानंतर दोघांनी हा सिनेमा हींदीत रिमेक करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता सलमान खान एकटाच हा सिनेमा हींदीतून रिमेक करत आहे आणि याची अधिकृत घोषणा सलमान लवकरच करणार आहे.

- Advertisement -

 

मुळशी पॅटर्न या चित्रपटात अभिनेता उपेंद्र लिमयेने साकारलेली पोलिसाची भूमिका सलमान या रिमेकमधून साकारणार आहे. तर सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्मा हा देखील एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. सैराट या मराठी चित्रपटाच्या रिमेक नंतर आता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला मुळशी पॅटर्न या सिनेमाचा देखील हिंदीतून रिमेक होत असून प्रेक्षकांची उत्सुकत्ता यामुळे आता वाढली आहे.

कसा आहे सिनेमा?

मुळशी पॅटर्न हा सिनेमा २०१८ सालीच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता यानंतर आता याचा हिंदी रिमेक येत आहे. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेतीकरून तोट्यात जाण्यापेक्षा जमिन विकून खूप पैसे मिळवण्याचा हव्यास करणाऱ्या तरूण पिढीवर आधारीत हा सिनेमा आहे. हा चित्रपट प्रदर्शित होतानाच सलमान आणि अरबाजसाठी याचे वेगळे स्क्रिनींग ठेवले होते त्याच वेळेस याचा हिंदी रिमेक करणार असल्याचे सलमान म्हणाला होता.


हेही वाचा- मालिका बघून तीने घेतला काळ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -