घरमनोरंजनसलमान-सन्नी एकत्र येतील?

सलमान-सन्नी एकत्र येतील?

Subscribe

जवळपास २३ वर्षांपूर्वी सलमान आणि सनी देओलचा जीत रिलिज झाला होता. यात तब्बू आणि करिश्मा कपूरही होती. त्यानंतर या दोघांचा एकही सिनेमा एकत्र आलेला नाही. यमला पगला दिवाना, फिरसे चित्रपटाच्या प्रमोशनिमित्त सन्नी देओलला विचारण्यात आलं की तो सलमानसोबत चित्रपट करेल का? त्यावेळी सन्नीनं सांगितलं की, चित्रपटाच्या कथानकाची मागणी असेल तर तो कोणासोबतही चित्रपट करायला तयार आहे. दुसरीकडे सलमान खाने त्यावेळी जीत साईन केला होता कारण सन्नी देओल त्यावेळी मोठा स्टार होता. सोबतच सलमानचं फिल्मी करिअर जरासं अडचणीत आलं होतं. सन्नीसोबत स्क्रीन शेअर केल्यामुळे आपल्यालाही फायदा होईल, असा सलमानचा उद्देश होता. तो सफल झाला. जीत बॉक्स ऑफिसवर बर्‍यापैकी चालला. पण या दोघांना घेऊन चित्रपट बनवणार कोण? हा प्रश्न आहेच. दुसरीकडे सन्नी देओलसोबत शहारुखनेही डर मध्ये काम केलं होतं. यातही जुही चावला नायिका होती. हे दोन्ही चित्रपट लव्ह ट्रँगलच्या कथानकावर आधारलेले होते. पण तिसरा खान म्हणजेच आमिरसोबत एका चित्रपटांत सनी त्याआधीही झळकला आहे. राजकुमार संतोषीच्या दामिनीमध्ये एका गाण्यात आमिर खान होता. पण या दोघांचा एकही सीन चित्रपटात नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -