घरमनोरंजन'दस का दम'मध्ये सलमानचा परत तोच दम

‘दस का दम’मध्ये सलमानचा परत तोच दम

Subscribe

सलमान खानने २००८ साली ‘दस का दम’ या क्विझ शो मधून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. सुरुवातीला जम बसवायला थोडा वेळ लागला. मात्र, सलमान प्रत्येक भागासोबत प्रामाणिकपणे खेळत गेला आणि त्याचा शो सर्वात जास्त टीआरपी खेचणारा ठरला होता. सलमान खान पुन्हा घेऊन येतोय ‘दस का दम’ द्वारे आपला दम दाखवायला सज्ज झाला आहे.

९ वर्षानं परत येतोय
सलमानशिवाय हा शो करायचा नसल्यामुळेच इतकी वर्ष गेली असल्याचं सांगण्यात येत आहे. सलमान मधल्या काळात व्यस्त होता. हा शो फक्त सलमाननेच करावा अशी निर्मात्यांचीदेखील इच्छा होती. त्यामुळे तब्बल ९ वर्षांनी सलमानचा शो प्रसारित होत आहे. या शोच्या रिसर्चसाठी ‘सोनी लिव्ह अॅप’ च्या माध्यमातून अनेक भारतीयांच्या मनात येणारे साधे-सरळ प्रश्न लोकांना विचारले आणि १५ लाख लोकांनी यात भाग घेत त्या प्रश्नांची उत्तरे दिली.

- Advertisement -

प्रेक्षकांचं मन जिंकणार का?
जवळजवळ नऊ वर्षांनंतर ‘दस का दम’ मधून सलमान खान पुन्हा एकदा आपल्या दमदार सूत्रसंचालनाने प्रेक्षकांची मनं जिंकणार का? असाच प्रश्न आहे. मात्र, सलमानचं फॅन फॉलोइंग पाहता यावेळीदेखील सलमान बाजी मारेल की परत तोचतोचपणा प्रेक्षकांना दिसेल हे आजच्या प्रिमियरमधून दिसेल. सलमानने प्रत्येक वेळी छोट्या पडद्यावर शो हिट करून दाखवले आहेत. त्यामुळे आता या शो चा टीआरपीसुद्धा सलमानमुळे वाढणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -