घरमनोरंजन'बॉटल कॅप चॅलेंज' मध्ये भाईजानची अनोखी स्टाईल

‘बॉटल कॅप चॅलेंज’ मध्ये भाईजानची अनोखी स्टाईल

Subscribe

या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर सलमानच्या चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद

सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांपासून ते मराठी कलाकार मंडळी ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची धूमाकूळ घालताना दिसत आहे. अक्षय कुमार असो किंवा सुनील ग्रोवर हे सगळेच फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकजण या चॅलेंजला पुर्ण करत आहे. अशातच बॉलिवूड जगतातील भाईजान कुठे मागे राहणारा नाही. नुकतेच सलमान खानने देखील हे ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पुर्ण केले आहे.

View this post on Instagram

Don’t thakao paani bachao

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

- Advertisement -

सलमान खान ने स्वीकारलेले हे ‘बॉटल कॅप चॅलेंज’ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सलमान खानने या व्हिडिओला आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर सलमानचे चाहते चांगलाच प्रतिसाद देत आहे.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान राऊंड किकने बाटलीचे झाकण उघडताना दिसत आहे. पण अचानक सलमान किक न करता आपल्या फूंकने बॉटलचे झाकण उडवून लावतो. त्यानंतर तो तिच बॉटल उचलून त्यातील पाणी प्यायला लागतो.

सलमानने यशस्वीरित्या हे चॅलेंज स्वीकारल्याने सलमानच्या चाहत्यांनी सलमानचे कौतुक करत या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. यासह सोशल मीडियावर #BottleCapChallenge खूपच ट्रेण्डमध्ये आहे. त्यामुळे हे चॅलेंज स्वीकारताना प्रत्य़ेक सेलिब्रिटी आपला वेगळा अंदाज दाखवताना दिसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -