भन्साळींच्या ‘ईन्शाल्ला’मध्ये दिसणार सलमान-आलियाची जोडी !

‘ईन्शाल्ला’या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार असून हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट असणार आहे.

Mumbai
‘ईन्शाल्ला’

‘हम दिल दे चुके सनम’ च्या २० वर्षानंतर संजय लीला भन्साली सोबत चित्रपट करणार आहे. हा येणारा चित्रपट भन्सालींचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. काही दिवसांपासून या चित्रपटाच्या नावासोबत अभिनेत्री कोण असेल याबद्दल चर्चा सुरू होत्या. मात्र आता अधिकृतरित्या असे समजते की, भन्साली आणि सलमान एकत्र काम करणार आहे. सलमानच्या पुर्णतः विरूद्ध असणारी अभिनेत्री आलिया भट्टला कास्ट केले आहे. भन्सालींच्या आगामी चित्रपटात भाईजान सलमान खान बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस आलिया भट्टसोबत ऑनस्क्रीन काम करताना दिसणार आहे.

‘ईन्शाल्ला’

सलमान-आलियाचा ऑनस्क्रीन रोमान्स

या आगामी चित्रपटाचे ‘ईन्शाल्ला’ असे चित्रपटाचे नाव असून सलमान आणि आलियाने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर याविषयीची माहिती दिली आहे. ‘ईन्शाल्ला’या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान खान आणि आलिया भट्ट एकत्र काम करणार असून हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट असणार आहे. चित्रपटाच्या मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाबद्दल सांगितले आहे. ‘ईन्शाल्ला’या चित्रपटाच्या नावावरून असे समजते की, या चित्रपटाची कथा लव्ह स्टोरीवर आधारित असून सलमानसोबत आलिया ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसतील.

‘बरोबर २० वर्षांनंतर मी संजय लीला भन्साळींच्या ‘इंशाअल्लाह’मध्ये एकत्र काम करणार आहोत, याचा मला आनंद आहे. आलियासोबत काम करण्यास मी उत्सूक आहे. ‘ईन्शाल्ला’ हा प्रवास यशस्वी होवो,’ असे सलमानने ट्वीट केले आहे.

तर आलियानेही ट्विट करत तिचा आनंद व्यक्त केला. ‘मी नऊ वर्षांची असताना पहिल्यांदा संजय लीला भन्साळींच्या ऑफीसमध्ये गेले होते. तेव्हापासून त्यांच्या चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहा असे म्हणतात आणि मी तेच केले. भन्साली आणि सलमान खान ही जो़डी अप्रतिम आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्यात मी खूप उत्सुक आहे,’असे ती म्हणाली.

‘ईन्शाल्ला’ चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे.