Eid Mubarak: भाईजानने चाहत्यांना दिल्या अनोख्या अंदाजात शुभेच्छा! फोटो व्हायरल

आपला फोटो शेअर करत सलमान खानने चाहत्यांना दिल्या बकरी ईदच्या शुभेच्छा

सलमान खान

ईदचा (Eid-Ul-Adha) उत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने सर्व सेलेब्रिटी बकरीदला शुभेच्छा देत आहेत. रमजान महिना संपल्यानंतर ७० दिवसानंतर मुस्लिम बांधवांचा हा खास सण साजरा केला जातो. या निमित्ताने नुकताच बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननेही चाहत्यांचे अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.

आपला फोटो शेअर करत सलमान खानने चाहत्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या असून त्याने आपला एक फोटो शेअर करून “ईद मुबारक” केले आहेत. चाहते या अभिनेत्याच्या पोस्टवर बऱ्याच प्रतिक्रिया देत आहेत. सध्या सलमान खानचे चाहते हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच शेअर करताना दिसत आहे.

View this post on Instagram

Eid Mubarak!

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

या फोटोमध्ये सलमान खान काळ्या टी-शर्टमध्ये दिसत असून त्याने तोंडावर कपड्याचा मास्क लावला आहे. सलमान खान सध्या आपल्या फार्म हाऊसवर शेती करीत आहे आणि तो त्यासंबंधित व्हिडिओ देखील शेअर केले आहेत.

कोरोना विषाणूमुळे यंदा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत नाही. तर लोकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणासाठी घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत सलमानने आपला फोटोदेखील शेअर केला आसून चाहत्यांना कोरोना टाळण्यासाठी सल्ला देताना दिसत आहे, जो चाहत्यांना मास्क लावण्यास प्रोत्साहित करीत आहे.


भात शेतीत सलमान चिखलाने माखला; म्हणतो शेतकऱ्यांचा करा सन्मान!