घरमहाराष्ट्रनाशिकचाहता म्हणतो, सलमानसाठी काय पण!

चाहता म्हणतो, सलमानसाठी काय पण!

Subscribe

सलमानचा सिनेमा बघण्यासाठी आशिष आपल्या सर्व मित्रांना वाजत गाजत घेऊन जातो. सलमानला भेटण्याची त्याची खूप इच्छा आहे.

सलमान खानचा आगामी भारत सिनेमा येत्या बुधवारी रिलीज होत आहे. सलमानच्या सिनेमांची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. अशाच एका सलमानच्या नाशिकमधील चाहत्याने सिनेमा पाहण्यासाठी आख्खे थिएटरच बुक केले आहे. आशिष सिंघल असे या चाहत्याचे नाव आहे.

View this post on Instagram

#SalmanKhan during the shoot of #Bharat! ?

A post shared by Salman Khan (@salmankhanfanclub) on

- Advertisement -

आशिष सलमानचे सगळे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो आणि आता तर गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आलेला भाईजानचा भारत मुव्ही फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेजरोडवरील पीव्हीआर हे पूर्ण थिएटरच त्याने बुक केले आहे.

View this post on Instagram

Exclusive Poster Of #SalmanKhan & #KatrinaKaif From #Bharat! ?

A post shared by Salman Khan (@salmankhanfanclub) on

- Advertisement -

सलमानचा सिनेमा बघण्यासाठी आशिष आपल्या सर्व मित्रांना वाजत गाजत घेऊन जातो. सलमानला भेटण्याची त्याची खूप इच्छा आहे. ज्या दिवशी सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल, अशी भावना आशिषने व्यक्त केली आहे. मोठे सिनेमे रिलीज होतात, तेव्हा तिकिटांच्या दरात वाढ केली जाते. सलमान खानच्या भारत सिनेमाच्या बाबतीत, असे घडणार नाही, कारण भारत सिनेमाच्या तिकिट दरात वाढ होणार नसल्याचे स्वतः सलमानने स्पष्ट केले आहे. भारत सिनेमात सलमान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे.

View this post on Instagram

#SalmanKhan and #KatrinaKaif for #Bharat! ?

A post shared by Salman Khan (@salmankhanfanclub) on

यामध्ये तरुण सर्कस चॅम्पियनपासून ६० वर्षाच्या व्यक्तीरेखेत सलमान दिसणार आहे. सिनेमात सहा दशकांचा एका व्यक्तीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ हे झळकणार आहे. अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री, भूषण कुमार, कृष्णकुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. अली अब्बास जफरने सिनेमाचं दिग्दर्शनं केले आहे. बुधवारी रमजान ईदच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -