घरमनोरंजन'भारत'च्या ट्रेलरमधून 'ही' अभिनेत्री गायब

‘भारत’च्या ट्रेलरमधून ‘ही’ अभिनेत्री गायब

Subscribe

'भारत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. मात्र, या ट्रेलरमध्ये स्टारची घोषणा करताना सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगण्यात आलेली 'ही' अभिनेत्री ट्रेलरमधून गायब असल्याचे दिसते आहे.

बहुचर्चीत असा दबंग सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटाचा ट्रेलर सोमवार २२ एप्रिल रोजी काही निवडक माध्यामांवर प्रदर्शित करण्यात आला. ‘भारत’ चित्रपट प्रदर्शित होण्या अगोदरच त्या चित्रपटातील सलमान खानचे लुक आणि टीझरमुळे चर्चेत होता. तसेच सोमवारी ‘भारत’ या चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच झाला. मात्र, ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये वेगळ्या चर्चेला उढाण आले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सलमान खान, कतरीना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, सुनील गोव्हर, सोनाली कुलकर्णी आदी कलाकार पाहायला मिळाले. मात्र, या ट्रेलरमध्ये एक चेहरा दिसलाच नाही. तो चेहरा म्हणजे, अभिनेत्री तब्बू. यामुळे सर्व चाहत्यांमध्ये एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे तब्बू का ट्रेलरमध्ये दिसली नाही?

- Advertisement -

या कारणामुळे भूमिका गुलदस्त्यात

‘भारत’ या चित्रपटामधील स्टारकास्टची घोषणा करण्यात आली. तेव्हा अभिनेत्री तब्बूची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले गेले होते. मात्र, सोमवारी ट्रेलर प्रदर्शित झाले, पण त्यामध्ये तब्बू कुठेच दिसली नाही. त्यामुळे चाहत्यांना ती कुठे गायब झाली? असा प्रश्न पडला आहे. ‘भारत’ चित्रपटामध्ये तब्बू दिसणार आहे. तसेच तिने या चित्रपटामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तिची भूमिका चित्रपटाचे क्लायमॅक्सला जोडलेली आहे. ट्रेलरमध्येच ‘भारत’ चित्रपटाचा क्लायमॅक्स समोर येईल. यामुळे तिची भूमिका गुलदस्त्यात ठेवण्यात आली असल्याचे समोर येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -