‘भारत’मध्ये दिसणार सलमानचा अनोखा अंदाज

या चित्रपटातील सलमानचा हा लूक चाहत्यांसह सगळ्यांनासाठीच लक्षवेधी ठरत आहे. यामध्ये सलमान खान सोबच कतरिना कॅफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Mumbai
salman-khan
अभिनेता सलमान खान

अली अब्बास जफर दिग्दर्शित अभिनेता सलमान खानचा चर्चेत असणारा‘भारत’या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील सलमानचा हा लूक चाहत्यांसह सगळ्यांनासाठीच लक्षवेधी ठरत आहे. यामध्ये सलमान खान सोबच कतरिना कॅफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यंदा ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमानचा या चित्रपटातील लूक त्याच्या इतर चित्रपटातील लूकपेक्षा खूपच वेगळा बघायला मिळणार आहे. सलमान पहिल्यांदा वेगळ्या अंदाजात दिसणार असून एका वयोवृद्ध भूमिकेत दिसणार आहे. त्याचा या लूकचा मेकअप अगदी खराखुरा वाटत आहे. ‘देश आणि एका व्यक्तीचा एकत्रित प्रवास,’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर लिहिली आहे. सलमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना सलमानने असे लिहीले की,” जितने सफेद बाल मेरे सिर पर और दाढ़ी में हैं, उससे ज्यादा रंगीन मेरी जिंदगी है”

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या “Ode To My Father” दक्षिण कोरियन चित्रपटावर भारत आधारलेला आहे. ‘भारत’ चित्रपटात रशियन सर्कस आणि अन्य काही साहसी दृश्य पाहायला मिळणार आहेत. ‘भारत’मध्ये दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू, सुनील ग्रोव्हर असे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here