घरमनोरंजन'भारत' चित्रपटाचे ट्रेलर लाँच; पहा ट्रेलर

‘भारत’ चित्रपटाचे ट्रेलर लाँच; पहा ट्रेलर

Subscribe

'भारत' चित्रपट सलमान खानच्या लुक आणि टीझरमुळे चर्चेत होता. तर आता नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर लाँच करण्यात आले आहे.

बॉलिवूडचा दबंग सलमान खानचा ‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘भारत’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा चित्रपटाचा ट्रेलर काही निवडक प्रसार माध्यमांवर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात सलमान खान सोबत कटरीना कैफ, दिशा पटानी, तब्बू, आणि सुनील ग्रोवर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट ५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. तसेच हा चित्रपट ‘ओड टू माई फादर’ या कोरियान चित्रपटाचा रिमेक आहे. ‘भारत’ चित्रपट येण्या अगोदरच त्याचे लुक आणि टीजर चर्चेत होते. त्या चर्चेत आता चित्रपटाच्या ट्रेलरची भर पडली आहे.

‘भारत’च्या ट्रेलरमध्ये काय?

‘भारत’ चित्रपटाचा ट्रेलर ३ मिनट ११ सेकंदाचा आहे. या ट्रेलरची सुरूवात फ्लॅशबॅकने करण्यात आली आहे.देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या आवाजाने  ट्रेलरची सुरूवात होते. या चित्रपटात ‘भारत’ची भूमिका सलमान खान यांनी केली आहे. तसेच या ट्रेलरमध्ये जॅकी श्रॉफची खास झलक दिसते. तसेच सलमान खान आणि कटरीना कैफ ही जोडी पुन्हा बॉक्सऑफिसवर धम्माल करणार हे ट्रेलर बघितल्यावरच लक्षात येत. ‘भारत’च्या जीवनातील ७१ वर्षाचा पूर्ण काळ ‘भारत’ चित्रपटामध्ये दाखवण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये सलमान खानचे अनेक लुक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सलमान खानच्या इतर चित्रपटाप्रमाणे या चित्रपटामध्येही अक्शन, रोमांस, देशप्रेम आणि कॉमेडी याचा ही समावोश असल्याचा भारत चित्ररटाच्या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -