घरमनोरंजन'दबंग ३' च्या सेटवरचा सलमान खानचा पहिला फोटो

‘दबंग ३’ च्या सेटवरचा सलमान खानचा पहिला फोटो

Subscribe

अखेर, सलमान खानच्या ‘दबंग ३’ चा पहिला लूक समोर आला आहे. सलमानचा बहुप्रतिक्षीत ‘दबंग ३’ हा चित्रपटाचं शुटींग सुरू झालं आहे. चाहत्यांना या चित्रपटाची अनेक दिवसापासून प्रतिक्षा आहे. दबंग, दबंग २ पाहिल्यानंतर दबंग ३ कधी येणार याची प्रतिक्षा अगदी सलमानलाही होती. इंदूरमध्ये या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली आहे.

आजपासून या चित्रपटाच्या शुटींगला सुरूवात झाली. या शुटींग दरम्यानचा एक फोटो सलमानचा फर्स्ट लूक समोर आला आहे. आपल्या चुलबुल पांडेंना पुन्हा एकदा बघून चाहते खूष झाले आहेत. त्याचा हा लूक बघून प्रेक्षक खूष होणार हे नक्की.

- Advertisement -

सलमान खान भारत आणि दबंग ३ चं शुटींग एकाचवेळी करणार होता. मात्र सलमानने भारत चित्रपटाच्या शुटींगनंतर दबंग ३ च्या शुटींगचा निर्णय घेतला आहे. प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करतोय.

- Advertisement -

दबंग ३ ला सोनाक्षीची वर्णी

सोनाक्षी सिन्हाने दबंग मधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. त्यानंतर ती सलमान बरोबर सलमान दबंग २ मध्येही दिसली. आता दबंग ३ मध्येही सोनाक्षीच सलमानबरोबर दिसणार आहे. सोनाक्षीबरोबरच महेश मांजरेकरांची मुलगी अश्वनी मांजरेकर महत्त्वाच्या भुमिकेत दिसणार आहे. मात्र अद्याप बाकीच्या कलाकारांची नावं गुलदस्त्यात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -