घरताज्या घडामोडीलॉकडाऊनमध्ये सलमान खानचा नवा उद्योग; ‘फ्रेश’ सॅनिटायझर

लॉकडाऊनमध्ये सलमान खानचा नवा उद्योग; ‘फ्रेश’ सॅनिटायझर

Subscribe

सलमान खान आता चक्क सॅनिटायझर विकताना दिसत आहे.

फिटनेस इक्विपमेंट, जिम, क्लॉदिंग आणि सायकल ब्रॅण्डनंतर सलमान खानने आता एक नवा उद्योग सुरु केला आहे. सलमान खान आता चक्क सॅनिटायझर विकताना दिसत आहे. त्याने ‘फ्रेश’ नावाची एक कंपनी सुरु केली आहे. या कंपनीचे बॉडी स्प्रे, परफ्युम, साबण आणि सौंदर्य प्रसाधने अशी अनेक प्रॉडक्टस लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलमान खानने ‘फ्रेश’ कंपनीच्या सॅनिटायझरची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ईदच्या निमित्ताने भाईजाने याची ट्विटरद्वारे घोषणा केली आहे.

काय म्हणाला सलमान खान

सलमान खानने ट्विटरद्वारे एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात तो म्हणतो की, ‘नवीन ग्रुमिंग आणि पर्सनल केअर ब्रॅण्ड फ्रेश लॉंच करत आहे. हा तुमचा, आमचा आणि आपल्या सगळ्यांचा ब्रॅण्ड आहे’, अशी माहिती त्यांने दिली आहे. यासोबतच त्यांनी अधिकृत वेबसाइट लिंकसुद्धा शेअर केली आहे.

- Advertisement -

सलमान खानच्या ‘फ्रेश’ कंपनीच्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु असून सलमानने फ्रेशची सुरुवात माजी टेनिस प्लेअर महेश भूपतीच्या स्केनशियल्स या ब्युटी ब्रॅण्डसोबत जॉइंट वेंचरच्या रुपात केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Video: …म्हणून कॉमेडियन वीर दासवर खोकला ‘हा’ व्यक्ती!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -