घरमनोरंजनबॉबी देओलच्या करिअरला सलमानचा 'दे धक्का'

बॉबी देओलच्या करिअरला सलमानचा ‘दे धक्का’

Subscribe

सलमान भाईची दिलदारवृत्ती बॉलिवूडमध्ये अनेकांनी अनुभवली आहे. कित्येक कलाकारांना त्याने फिल्म इंडस्ट्रीत ब्रेक दिला आहे, तर फ्लॉप ठरलेल्या कलाकारांच्या करिअरला चित्रपटांमध्ये संधी दिली आहे. सलमानची कृपादृष्टी आता बॉबी देओलवर पडली आहे. फिल्मी करिअर संपत आलेले असताना बॉबीसाठी सलमान खान एका अॅक्शनपटाची निर्मिती करणार आहे.

सोनाक्षी सिन्हाचा पहिला चित्रपट ‘दबंग’

सोनाक्षी सिन्हा, डेसी शाह, झरिन खान, कतरिना कैफ, आथिया शेट्टी, पुलकित समराट, इंद्रकुमार अशा कितीतरी कलाकारांना सलमान खानने चित्रपटांमध्ये कामं दिली आहेत. सुपरस्टार हिमॅन धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबीच्या थांबलेल्या करिअरला सलमान ‘धक्का’ देणार आहे. सलमानच्या सांगण्यावरुनच ‘रेस 3’ मध्ये बॉबीला भूमिका मिळाली. आता माहिती मिळतेय की, बॉबी सलमानच्या पुढच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार आहे.

- Advertisement -
झरिन खान सलमानसोबत ‘वीर’ चित्रपटात

‘रेस ३’ पूर्वी श्रेयस तळपदेच्या ‘पोश्टर बॉईज’ चित्रपटात बॉबीने भूमिका साकारली होती. बॉबी देओल दिर्घकाळापासून एखाद्या अॅक्शन चित्रपटात दिसलेला नाही. यासाठी तो नुकताच सलमानसोबत बोलला. बॉबीने केलेली रिक्वेस्ट आणि ‘रेस 3’ च्या ट्रेलरला मिळालेला पॉझिटिव्ह फीडबॅकपाहून सलमान आपल्या अंडर प्रोडक्शन चित्रपटात बॉबीला कास्ट करणार आहे. यापुर्वी बॉबीला पुन्हा शेपमध्ये येण्यासाठी सलमान मदत करतोय. याच कारणांमुळे बॉबी आता फिट दिसतोय. ‘रेस 3’ ट्रेलर रिलीजमध्ये सलमानने बॉबी देओलला ‘बॉडी देओल’ म्हणून बोलावले होते.

‘जय’ चित्रपटात डेसी शाह आणि सलमान खान

सलमान खान याने अनेक कलाकारांना चित्रपट मिळवून दिले आहेत. तर काहींच्या सिनेसृष्टीतील पदार्पणासाठी चित्रपट निर्मिती केली आहे.

- Advertisement -
फोटो सौजन्य- धर्मेन्द्र इंस्टाग्राम

धर्मेंद्र यांनी इंस्टाग्रामवर सलमान खानच्या रेस ३ चित्रपटाचे कौतुक केले असून स्वःताचा एक जुना फोटो शेअर केला आहे.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -