सलमान खानची कपिल शर्मावर कृपा

कपिल शर्मा गेले कितीतरी महिने छोट्या पडद्यावरून गायब होता. आता सलमान खान प्रॉडक्शन कपिलच्या नव्या शो ची निर्मिती करणार आहे.

Mumbai
salman and kapil
सलमान खान आणि कपिल शर्मा

कॉमेडी किंग कपिल शर्मा बर्‍याच महिन्यानंतर पुन्हा एकदा लहान पडद्यावर कमबॅक करणार आहे. १६ डिसेंबरपासून आपल्या नव्या शो साठी चित्रीकरणाला कपिल सुरुवात करणार असल्याची माहिती इंग्रजी वृत्तपत्र मिड-डेने दिली आहे. तर कपिलवर बॉलीवूडचा हँडसम हंक सलमान खानची कृपा झाल्याचीही माहिती समोर येते आहे. कपिल शर्माचा हा नवा शो सलमान खानचे प्रॉडक्शन हाऊस प्रॉड्यूस करणार आहे. पुढच्या महिन्यातच या शो च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. यापूर्वी कपिल स्वतःच आपला शो प्रॉड्यूस करत होता. मात्र आता खुद्द सलमान खानचे प्रॉडक्शन हाऊस हा शो प्रॉड्युस करणार आहे. यासाठी फिल्म सिटीच्या आठव्या मजल्यावर स्टुडिओ बनविण्यात आलेला आहे.

सुनीलच्या वादानंतर कपिल गायब

कपिल शर्माचा कॉमेडी नाईट्स विथ कपिल हा शो बंद झाल्यानंतर गेले बरेच महिने कपिल छोट्या पडद्यावर दिसला नाही. त्यानंतर फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा हा शो आला मात्र हा शो दोन आठवड्यातच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कपिल शर्माचे सुनील ग्रोव्हरशी झालेल्या भांडणांनंतर कपिलची मानसिक स्थिती नीट नव्हती अशीही चर्चा होती. त्यानंतर कपिलने लाईमलाईटपासून दूर राहणचे पसंत केले. नुकतीच कपिलने एका पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली होती. कपिलने भांडणानंतर सुनीलची बर्‍याच वेळा माफी मागितल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र सुनील आणि कपिल त्यानंतर कधीही परत आले नाहीत.

लवकरच कपिलही होणार विवाहबद्ध

कपिल शर्माही लवकरच विवाहबद्ध होणार असून आपली गर्लफ्रेंड गिन्नी हिच्यासह पुढच्या महिन्याच्या १२ तारखेला जालंधरमध्ये लग्न करणार आहे. त्यानंतर आपल्या मित्रमंडळींसाठी १४ तारखेला मोठे रिसेप्शन कपिल देणार असून लगेचच तो आपल्या नव्या शो च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त होणार असल्याचे सध्या समोर येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here