घरमनोरंजनबॉबीच्या जाळ्यात अडकला सलमान खान

बॉबीच्या जाळ्यात अडकला सलमान खान

Subscribe

सलमाननं आपल्याला नक्की कोण आवडतं हे बॉबी देओलला स्पष्ट सांगितलं. शो दरम्यान बॉबीच्या प्रश्नांना उत्तरं देताना सलमाननं आपलं मन मोकळं केलं.

सलमान खान कधी लग्न करणार? हा प्रश्न सध्या राष्ट्राचा प्रश्चच झाला आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर सलमानच्या कुटुंबीयांनादेखील माहीत नाही. पण तरीही प्रत्येकाला या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता आहे. अशी कोणती मुलगी आहे जिची जागा सलमानच्या मनात आहे? हा प्रश्न सगळ्यांनाच आहे. सलमानच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक मुली आल्या आणि गेल्या. पण त्यांच्या फक्त चर्चाच झाल्या. त्यांच्या बाबतीत पुढे काहीच घडलं नाही. पण यावेळी सलमानच्या मनात नक्की कोण आहे? हे जाणून घेण्यात बॉबी देओल यशस्वी झाला आहे. एकप्रकारे सलमान खान बॉबीच्या जाळ्यात अडकला. यावेळी सलमाननं आपल्याला नक्की कोण आवडतं हे स्पष्ट सांगितलं.

सलमानची आवड आहे कतरिना कैफ

वास्तविक बॉबी देओल आणि अभिनेता धर्मेंद्र आपल्या आगामी ‘यमला पगला दीवाना – ३’ च्या प्रमोशनसाठी ‘दस का दम’मध्ये आले होते. या दरम्यान सलमान, बॉबी आणि धर्मेंद्र यांच्यामध्ये धमाल चालू होती. तेव्हाच बॉबी देओलनं धर्मेंद्र आणि सलमानला काही प्रश्न विचारण्याची इच्छा सांगितली. दोघांनीही होकार दिल्यानंतर या संधीचा फायदा उचलत बॉबीनं पहिलाच प्रश्न सलमानला विचारला, ‘जुन्या आणि नव्या हिरॉईनमध्ये तुझी कोण आवडतं?’ सलमान सुरुवातीला या प्रश्नांचं उत्तर देत नव्हता. मात्र, शेवटी आपल्याला जुन्या हिरॉईन्समध्ये मधुबाला आणि नव्या हिरॉईनमध्ये कतरिना कैफ आवडत असल्याचं सांगितलं. सलमाननं कतरिनाचं नाव घेताच बॉबी देओलसहित सर्वच प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्या वाजवायला सुरुवात केली. बॉबीला हे उत्तर आधीच माहीत असल्याचं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. यानंतरही बॉबीनं खूप प्रश्न विचारले मात्र सलमाननं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.

- Advertisement -

सध्या ‘भारत’च्या चित्रीकरणात व्यस्त

सलमान आणि कतरिना हे दोघेही सध्या ‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. आतपर्यंत सलमान आणि कतरिनानं एकत्र काम केलेले चित्रपट नेहमीच सुपरहिट ठरले आहेत. दरम्यान या चित्रपटात सलमान आणि कतरिनाबरोबर दिशा पटानी आणि सुनील ग्रोव्हरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -