सलमान कोरोना निगेटिव्ह, आता पुन्हा एकदा बिग बॉसचा होस्ट

salman khan test coronavirus negative to shoot for bigg boss weekend ka vaar
सलमान कोरोना निगेटिव्ह, आता पुन्हा एकदा बिग बॉसचा होस्ट म्हणून सज्ज

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या ड्रायव्हर आणि दोन स्टाफला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहेत. ज्यानंतर सलमान खानने स्वतःला आयसोलेटेड केले होते. या बातमीनंतर सलमान खान बिग बॉस १४ होस्ट करणार की नाही अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता सलमानच्या चाहत्यांसाठी आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे की, सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट केली आणि त्यांनी स्वतःला आयसोलेटेड केले होते. आता सलमानसह त्याच्या कुटुंबायांच्या टेस्टचा रिपोर्ट आला आहे. त्याचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. नियमांनुसार आणि सुरक्षेचीबाब लक्षात घेऊन महापालिकेने सलमान खानचे घर सॅनिटाईज केले आहे. दरम्यान पहिल्यांदा अशी माहिती समोर आली होती की, सलमान खान एक आठवडा स्वतःला आयसोलेटेड करेल, परंतु आता सलमान खान बिग बॉसचे शूटिंग करणार आहे, असे समोर आले आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानचा खान ‘राधे’ चित्रपटांची शूटिंग सुरू झाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेत्री दिशा पटानी दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगसोबत दुसऱ्या बाजूला सलमान खान बिग बॉस १४ होस्ट करत आहे. सलमान खान ११ वर्षांपासून बिग बॉस एक भाग आहे. आताच्या पर्वात देखील सलमान होस्ट करत आहे. सलमान खानचे बिग बॉसमधील होस्टिंग चाहत्यांना खूप आवडत असते. त्यामुळे चाहत्यांना सलमानचा ड्रायव्हर आणि स्टाफमधील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर बिग बॉस शो होस्ट करणार की नाही असा प्रश्न पडला होता. पण माहितीनुसार आता सलमान खान बिग बॉस शो होस्ट करणार असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा  – अक्षय कुमार भडकला, युटयूबरला ठोकला ५०० कोटींचा मानहानीचा दावा!