सलमानने बघितला मलंगचा ट्रेलर, दिली ‘अशी’ प्रतिक्रीया!

Mumbai
सलमान खान

अभिनेता आदित्य रॉय कपूर, अनिल कपूर, कुणाल खेमू आणि दिशा पटानी यांचा आगामी चित्रपट मलंग चा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमधली दिशा पटानी आणि आदित्य रॉय कपूरचा रोमॅण्टीक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. बॉलिवूडच्या कलकारांना देखील मलंगचा हा ट्रेलर आवडला आहे. आता मलंगच्या ट्रेलरवर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानने ही आपली रिएक्शन दिली आहे. सलमानने ट्वीटकरत आपली रिअॅक्शन दिली आहे. यावेळी सलमानने आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि अनिल कपूरला टॅग केलं आहे. सध्या हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमानने ट्विटरमध्ये लिहीलं आहे की, ‘उई मां……झकास ट्रेलर’ आणि त्यांनी चित्रपटातील सगळ्या कलाकारांना टॅग केलं आहे. चित्रपटाच्या आणि सलमानच्या फॅन्सने ट्विटरवर अेक कमेंटस केल्या आहेत.

‘मलंग’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहीत सुरी याने केलं आहे. ७ फेब्रुवारीला ‘मलंग’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून पहिल्यांदा अभिनेता आदित्य रॉय आणि अभिनेत्रा दिशा पटानी एकत्र दिसणार आहे. त्यामुळे ही बॉलिवूडची नवी जोडी बॉक्स ऑफिसवर भुरळ पाडते की नाही हे येत्या काळात समजले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here