Video : ‘स्पोर्ट्स ब्रा’ घातली म्हणून अभिनेत्रीला उद्यानात मारहाण!

कन्नड अभिनेत्री समयुक्ता हेगडेला सार्वजनिक उद्यानात मारहाण झाली आहे. अभिनेत्री संयुक्तावर कॉंग्रेस नेत्या कविता रेड्डी यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यामागचं कारण म्हणजे संयुक्ता आणि तीची मैत्रीणी स्पोर्ट्स ब्रा घालून बागेत व्यायाम करत होत्या. मात्र कविता रेड्डीने  हे आरोप फेटाळून लावले आहेत. कविता रेड्डी यांचे असं म्हणणं आहे की, समयुक्ता आणि तीची मैत्रीण मोठ्या आवाजात गाणी लावत होते. त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा रक्षकाशी गैरवर्तन केलं. त्यांना थांबवण्याच्या नादात थोडीशी मारहाण त्यांना झाली.

समयुक्ता हेगडेने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि तीने बंगळुरू पोलिसांकडे कविता रेड्डी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. समयुक्ताने इंस्टाग्रामवर लाईव्ह करून याविषयी माहिती दिली होती. यावेळी तीने मुलींच्या कपड्यांवरून कविता यांनी भांडण केल्याचं म्हटलं आहे.

समयुक्ताने म्हटलं आहे की, आम्ही तिघंजणं बागेत व्यायाम करत होतो. तेव्हा अचानक तीथे कविता रेडडी आल्या आणि आम्हाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच म्हणणं होतं की आम्ही चुकीचे कपडे घातले आहेत आणि आम्ही व्यायामाच्या ऐवजी कॅब्रे करत आहोत. त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी कविता यांच्या बोलण्याला समर्थन दिलं. आणि म्हणायला लागले की आपल्या संस्कृतीत स्पोर्ट्स ब्रा घालणं लिहीलेलं नाही.

यावर बोलताना कविता रेड्डी यांनी म्हटलं की, ते तिघं गार्डनमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवत होते. डान्स करत होते. आम्ही त्यांना आडवलं तर त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या. समयुक्ता सगळं पब्लिसिटीसाठी करत आहे.