करून करून भागले, देवधर्माला लागले; इस्लामसाठी सना खानचा बॉलिवूडला निरोप

sana khan says good bye film industry for islam religion
करून करून भागले, देवधर्माला लागले; इस्लामसाठी सना खानचा बॉलिवूडला निरोप

‘बिग बॉस ५’ची रनरअप आणि सलमानची सहकलाकार अभिनेत्री सना खान हिने आपल्या अंदाजाने अनेक लोकांच्या मनात आपली जागा मिळवली आहे. पण सनाने तिच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज दिली आहे. सनाने आता दंगल गर्ल जायरा वसीमच्या पावलावर पाऊल ठेवून अभिनय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. तिने धर्माचे कारण देऊन अभिनय क्षेत्र सोडल्याचे सांगितले आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या धर्माला आधार मानत बॉलिवूड सोडल्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या सनाची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच तिच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी माझ्या आयुष्यात आज महत्त्वाच्या वळणावर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी चित्रपटसृष्टीत काम केले. मला त्या काळात प्रसिद्धी, पैसा, सन्मान या सर्व गोष्टी मिळाल्या. पण पैसा आणि प्रसिद्धीच्याच मागे धावणे हा एकच जगण्याचा उद्देश आहे का, असा प्रश्न मला पडला. प्रत्येकाचे गरजू व्यक्तींना मदत करण्याचे कर्तव्य नाही का?, अशा प्रश्नांची उत्तर मी बऱ्याच काळापासून शोधत होते. मी जेव्हा माझ्या धार्मिक शिकवणीत या प्रश्नांची उत्तर शोधली, तेव्हा कळाले की, फक्त पैसा आणि प्रसिद्ध कमावण हाच आयुष्याचा एकच उद्देश नाही आहे. त्यामुळे आजपासून मी चित्रपटसृष्टीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे मी गरजू लोकांची सेवा करेन.’

काही महिन्यांपूर्वी सना खान तिच्या एक्स बॉयफ्रेंड डान्सर मेलविन लुईसमुळे चर्चेत आली होती. तिने अनेक मेलविनवर अनेक आरोप केले होते. तसेच तिने त्याच्याबद्दल अनेक सोशल मीडियावर पोस्ट शेअर देखील केल्या होत्या. आता सना अभिनय क्षेत्र सोडल्यामुळे चर्चेत आली आहे.


हेही वाचा – २३ वर्षांनंतर सलमानची हिरोईन करणार कंगनाच्या सिनेमातून कमबॅक