सानिया मिर्झाच्या बहिणचं ठरलं ‘या’ क्रिकेटपटूशी लग्न!

Mumbai

टेनिसपटू सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीन यांचा मुलगा असदला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र होती. पण नुकतेच सानियाने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या वर्षाअखेरीस अनम आणि असद लग्न करणार आहेत. अनमचा हा दुसरा निकाह असून गेल्याच वर्षी तिने पती अकबर रशीदशी घटस्फोट घेतला.

View this post on Instagram

Family ❤️ @asad_ab18

A post shared by Sania Mirza (@mirzasaniar) on

असद आणि अनम यांच्या लग्नाच्या चर्चा ही खरी आहे. मी नुकतीच पॅरिसला अनमच्या बॅचलरेट पार्टीला जाऊन आले. आता असद आणि अनम हे दोघे डिसेंबरमध्ये लग्न करणार आहेत.

अनम ही एका गोड मुलाच्या प्रेमात आहे. त्याच्याशी तिचं लग्न होणार आहे. त्या मुलाचं नाव असद आहे आणि तो माजी क्रिकेटपटू अझरुद्दिन यांचा मुलगा आहे” अशी प्रतिक्रिया सानियाने दिली.

अनम हा फॅशन डिझाइनर आहे. त्याचे स्वत:चे फॅशन आऊटलेट देखील आहेत. तर वडिलांप्रमाणेच असदला क्रिकेटमध्ये करिअर करायचे असून त्याची गोव्याच्या रणजी टीममध्ये निवडदेखील झाली होती. अनम असदपेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठी आहे. या दोघांना अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिलं गेलं होतं. सानियाने मार्च महिन्यात असदचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत कॅप्शनमध्ये ‘फॅमिली’ (कुटुंब) असं लिहिलं होतं.