Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर ताज्या घडामोडी केजीएफमधील संजय दत्तचा लूक हॉलीवूड कॅरक्टरची कॉपी

केजीएफमधील संजय दत्तचा लूक हॉलीवूड कॅरक्टरची कॉपी

Mumbai
sanjay dutt look inspired from hollywood show vikings and this is how social media users are reacting
केजीएफमधील संजय दत्तचा लूक हॉलीवूड कॅरक्टरची कॉपी

साऊथ स्टार यश ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF Chapter 2) या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या चित्रपटातील संजय दत्तचा लूक प्रदर्शित झाला होता. संजय दत्तने हा लूक ६१ व्या वाढदिवशी सोशल मीडियावर शेअर केला होता. या चित्रपटात संजय दत्तचे नाव अधीरा असून यामध्ये तो नकारात्मक भूमिका साकारत आहे. दिग्दर्शक प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. त्यामुळे संजय दत्तचा या चित्रपटातील लूक कसा असेल याची उत्सुकता सर्व चाहत्यांमध्ये होती. मात्र आता संजय दत्तचा लूक प्रदर्शित झाल्यानंतर तो हॉलिवूडच्या एका वेबसीरिजच्या व्यक्तिरेखेने प्रेरित झाला असल्याचे म्हटले जात आहे.

इन्स्टाग्राम पेज डाइट सब्याने संजय दत्तच्या पोस्टरसोबत वाइकिंग्स नावाच्या वेबसीरिजचा पोस्टर शेअर केला आहे. तसेच केजीएफ चॅप्टर २च्या मेकर्स लूक कॉपी केल्याचा आरोप केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नील यांनी सांगितले आहे की, संजय दत्तचा लूक रागनर लोथब्रोक या व्यक्तिरेखेने प्रेरित आहे. या शोचे अनेक सीजन रिलीज झाले आहेत.

संजय दत्त व्यतिरिक्त यश आणि रवीना टंडन देखील या चित्रपटात दिसणार आहेत. २०१८मध्ये यशचा चित्रपट केजीएफ प्रदर्शित झाला होता. हा कन्नड चित्रपट हिंदी, मल्याळम, तेलुगू आणि तामिळ भाषेत डब करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमलीची कमाई केली होते. त्यानंतर चाहते या चित्रपटाच्या सिक्वलची वाट पाहत होते.


हेही वाचा – Coronavirus: महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर केली मात


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here