माझ्यावरचा ‘कलंक’ पुसला गेला – संजय दत्त

Mumbai
sanjay datt
संजय दत्त

लवकरच करण जोहरचा बहूचर्चित कलंक हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर सगळ्यांसमोर आला आणि चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढली. या टीझर लाँच सोहळ्यात चित्रपटाविषयी बोलताना संजय दत्त म्हणाला, माझ्या कपाळावर एक कलंक होता. मात्र आता तो पुसला गेला आहे.

१९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटोमध्ये संजय दत्तला दोषी ठरविण्यात आलं होतं. त्याला शिक्षाही ठोठावली. त्याप्रकरणी संजयला पाच वर्षाचा कारावासही झाला. या हल्यात दोषी ठरविण्यात आल्यामुळे हा संजय दत्तवर ‘कलंक’ होता. टीझर लाँचवेळी तुमच्या माथ्यावर लागलेला असा कोणता कलंक आहे का जो तुम्ही दूर करु इच्छिता, असा प्रश्न संजयला विचारण्यात आला होता यावर उत्तर देतांना, हो माझ्या माथ्यावर एक कलंक होता. मात्र आता तो पुसला गेला आहे, असं संजयने यावेळी म्हटलं.

 वरूण धवन,आलिया भट्ट,माधुरी दीक्षित,संजय दत्त,सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर अशी तगडी स्टार कास्ट चित्रपटात आहे. नुकताच  चित्रपटाचा जबरदस्त टीझर लाँच झाला. या टीझरला प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली. तगडी स्टार कास्ट, भव्य सेट, स्वातंत्रपूर्व काळातील कथानक, जबरदस्त डायलॉगने भरलेला असा हा टीझर आहे. यामुळे प्रेक्षकांची चित्रपटाविषयी आणखी उत्सुकता वाढली आहे.

कलंक चित्रपट १९ एप्रिलला नाही तर १७ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. १७ एप्रिलला महावीर जयंती आहे त्यामुळे अनेकांना सुट्टी असते. तर १९ एप्रिलाल गुड फ्रायडेची सुट्टी आहे. एकाच आठवड्यात या दोन सुट्ट्या आल्याने चित्रपटाच्या कमाईवर त्याचा परिणाम होईल या विचाराने चित्रपटाची तारीख बदलण्यात आली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here