घरमनोरंजनमोदींना संजय भन्साळी देणार वाढदिवसाची अनोखी भेट!

मोदींना संजय भन्साळी देणार वाढदिवसाची अनोखी भेट!

Subscribe

हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारलेला चित्रपट असणार आहे. मोदींच्या आयुष्याशी संबधित ज्या गोष्टी लोकांसमोेर आलेल्या नाहीत त्या या चित्रपटातून मांडण्याचा भन्सालींचा प्रयत्न

अभिनेता सलमान खान आणि आलिया भट्ट सारखे स्टारकास्ट असणाऱ्या इंशाअल्लाह या चित्रपटानंतर चर्चेत आलेले निर्माते संजय लीला भन्साळी आता मन बैरागी हा चित्रपट तयार करणार आहे. हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारलेला चित्रपट असणार आहे. त्याच्या आयुष्याशी संबधित अशा काही गोष्टी दाखवण्यात येण्यार आहे, ज्या लोकांच्या समोर आलेल्याच नाही. पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसानिमित्त निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक अनोखी भेट देणार असून ही भेट म्हणजे पंतप्रधान मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘मन बैरागी’ हा चित्रपट.

‘मन बैरागी’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर होणार आज लाँच 

या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज लाँच होणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं पहिलं पोस्टर सुपरस्टार प्रभासच्या हस्ते लाँच करण्यात येणार आहे. ‘या चित्रपटाची कहाणी अशी आहे की, जी सर्वांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे.’, असे संजय लीला भन्साळी यांनी सांगितले तर, या चित्रपटाचे लेखक संजय त्रिपाठी यांनी सांगितले की, ‘माझ्यासाठी ही एक अशा माणसाची गोष्ट आहे जो स्वतःला शोधण्यासाठी निघाला आणि आज देशातील सर्वात मोठा नेता झाला.’

- Advertisement -

नरेंद्र मोदींचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न संजय लीला भन्साळी यांनी केला आहे. भन्साळीसोबत महावीर जैन यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून संजय त्रिपाठी या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

- Advertisement -

या आधीही महावीर जैन यांनी ‘चलो जीते है’ या मोदींच्या बालपणावर आधारित शॉर्टफिल्मची निर्मिती केली होती. या शॉर्टफिल्मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -