घरमनोरंजनसंजू' ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

संजू’ ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

रणबीरच्या अदाकारीने साकारला संजू

यावर्षीचा सर्वात जास्त चर्चिला जास असलेला ‘संजू’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. रणबीर कपूर आणि विकी कौशल यांची अप्रतिम अदाकारी या ट्रेलरमध्ये बघायला मिळत असून संजय दत्तच्या आयुष्यातील सर्व गोष्टी या चित्रपटातून समोर येणार आहेत, ज्याबद्दल आजपर्यंत केवळ वृत्तपत्रांमधून माहिती मिळाली आहे. या चित्रपटात संजय दत्त ऊर्फ संजूबाबाच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. थोड्याच दिवसांपूर्वी या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. प्रेक्षकांना या टिझरनंतर ट्रेलरबद्दल खूपच उत्सुकता होती. यातील ‘आय अॅम नॉट अ टेररिस्ट’ हा संवाद साहजिकच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

९० च्या दशकात संजूची होती हवा

‘संजू’ हा ९० च्या दशकातील सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित असून संजय दत्तने आयुष्य कसे जगले याचा संपूर्ण लेखाजोखा यामध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानीने घेतला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर रणबीर कपूरच्या अभिनयाने प्रभावित झाल्याचे प्रेक्षक सांगत आहेत.

- Advertisement -

२९ जूनला होणार प्रदर्शित

रणबीर कपूरचा ‘संजू’ २९ जूनला प्रदर्शित होणार आहे. मात्र, चित्रपट हिट होण्यापूर्वी त्याच्या ट्रेलरकडूनदेखील बऱ्याच लोकांना अपेक्षा होत्या. ट्रेलर पाहिल्यानंतर रणबीरने घेतलेली मेहनत नक्कीच वाखाणण्याजोगी आहे असे दिसत आहे. हे ट्रेलर एकाच वेळी पाच वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहेत. मुंबईबरोबरच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिल्ली, अहमदाबाद, लखनऊ आणि कोलकाता या ठिकाणी एकाच वेळी हे ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले. १ तासाच्या आत ९६,३७० लोकांनी ट्रेलर पाहिले आहे.

का खास आहे ‘संजू’?

‘संजू’ हा चित्रपट चित्रिकरण चालू झाल्यापासूनच चर्चेत आहे. संजय दत्त ही अशी व्यक्ती आहे ज्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे आणि त्यामुळेच तो खास आहे. संजय दत्तच्या आयुष्यात बरेच उतार – चढाव आले, तर त्याचं आयुष्य हे नेहमीच ग्लॅमरसदेखील राहिले आहे. शिवाय हा चित्रपट रणबीरच्या करियरलादेखील एक वेगळे वळण देऊ शकतो. तसंच राजकुमार हिराणी हा असा दिग्दर्शक आहे जो नेहमीच आपल्या चित्रपटातून अशा कथा आणतो ज्या लोकांना नेहमीच भावतात. त्यामुळे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -