सपना चौधरीने दिला मुलाला जन्म; लोकांनी अश्लील कमेंट केल्यानंतर पती भडकला

सिंगर सपना चौधरी आणि तिचा पती वीर साहू

हरियाणवी सिंगर आणि डांसर सपना चौधरीने ४ ऑक्टोबर रोजी मुलाला जन्म दिला आहे. सपनाच्या नवऱ्याने ही गुड न्यूज सांगितल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर अश्लील कमेंट द्यायला सुरुवात केली. त्यानंतर भडकलेल्या सपनाच्या नवऱ्याने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून ट्रोलिंग करणाऱ्यांचा समाचार घेतला. सपनाचा पती वीर साहू हा देखील हरियाणवी सिंगर, लेखक आणि मॉडेल आहे. जानेवारी २०२० रोजी दोघांनी रजिस्टर पद्धतीने विवाह केला होता. अनेकांना सपना चौधरीचे लग्न झाले आहे, हे देखील माहीत नव्हते. त्यामुळे अचानक मुलगा झाल्याची बातमी आल्यानंतर अनेक चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच सपनाचा पती वीर साहूला त्याची ओळख काय? असा प्रश्न विचारला होता.

‘तेरी आंख्या का यो काजल’ या एका गाण्याने सपना चौधरीला रातोरात स्टार बनविले. हरयाणामध्ये स्टेजवर परफॉर्म करणारी सपना चौधरी सेलिब्रिटी झाली. उत्तर भारतात तिचे फॅन फॉलोईंग मोठ्या संख्येने आहे. मात्र अनेकांना सपनाचे लग्न झाल्याचे माहीत नव्हते. त्यामुळे वीर साहूला अनेकांनी कमेंट करुन याबद्दल विचारणा केली. त्यावर वीर म्हणाला की, “आम्ही आमच्या मर्जीने लग्न केलेले आहे. लोकांना काय अडचण आहे. आमच्या खासगी आयुष्यात आम्ही काय करतो, याची माहिती मी जगाला का देऊ? मला कुणाचीही फिकीर नाही. मी एका शेतकऱ्याचा मुलगा असून मला स्वाभिमानाने जगायला आवडतं.”

‘सपनाला मुलगा झाला’ या आशयाला पकडून अनेक लोक घाणेरडे जोक्स बनवून फॉरवर्ड करत आहेत. माझे आव्हान आहे, तुमच्यात हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन आमच्याबद्दल बोलून दाखवा. मग मी तुम्हाला दाखवतो की कलाकार आणि बदमाश यातील फरक काय असतो? लग्न न करता मुलगा कसा झाला? असेही प्रश्न अनेकांनी सपनाला विचारले होते. त्यावर वीर म्हणाला की, जर आम्ही लोकांना लग्नाच्या बाबत सांगितले नाही, तर आमचे लग्न बेकायदेशीर ठरते का?

सपना चौधरी ही बिग बॉस सीझन ११ मध्ये सहभागी झाली होती. तेव्हा पासून तिचा बॉलिवूडमध्येही दबदबा राहिलेला आहे. सपना आई झाल्याच्या बातमीला तिच्या आईने देखील दुजोरा दिलेला आहे.

 

बाहन बेटी मत देखो इस video नै…🙏🏻आज़ एक कलाकार नही एक घरेलू आदमी बोले है जिसे हद्द से ज़्यादा टोरचर किया गया है उसकी पर्सनल लाइफ़ को लेकर..सबकी list है मेरे पै..एक एक का हिसाब होगा..बेशक नाम ना ल्यू …एक एक का बेरा है…कौन म्हारा है और कौन ग़द्दार…यू ट्रेलर है आगै सबका नम्बर है …समझ जाओ

Posted by Veer Sahu on Tuesday, October 6, 2020