आई झाल्यानंतर पहिल्यांदाच ग्लॅमरस अंदाजात दिसली सपना चौधरी; फोटो व्हायरल

हा ग्लॅमरस अंदाज पाहून सपनाचे चाहते खूप तिच्यावर फिदा

सपना चौधरी

बिग बॉस 11 मधील एक भाग असलेली हरियाणाची स्टार डान्सर सपना चौधरी आजकाल तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. लग्नापासून आई होईपर्यंत सपना चौधरी यांनी सर्व काही सिक्रेट ठेवले. तर नुकताच करवा चौथच्या दिवशी सपनाने तिचा पहिला फोटो तिच्या पतीसोबत शेअर केला.

आता सपनाने आई झाल्यावर तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टावर शेअर केले आहेत. हा ग्लॅमरस अंदाज पाहून सपनाचे चाहते खूप तिच्यावर फिदा आहेत. या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये सपना चौधरी खूपच फिट दिसत आहे. आई झाल्यानंतर सपनाने आपले वाढलेले वजन कमी केले असून ती पुर्वीच्या रुपात परतली आहे. अलीकडेच तिने एक फोटोशूटही केले आहे ज्यात तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळतोय. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोशूटमध्ये सपना व्हाइट पेंटसूटमध्ये पोज करताना दिसत आहे. तिने आपल्या ओठांवर बोल्ड मेटलिक ब्लू लिपस्टिक आणि डोळ्यावर पांढरे आईलाइनर लावले आहे. दोन हेअर बन्ससह सपनाने आपला हा लूक पूर्ण केला आहे. या लूकबद्दल आपल्या टीमचे आभार मानत सपनाने फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या टीमला टॅग करताना तिने लिहिले, “क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट आणि स्टायलिंगसाठी धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

Happy karva chauth……..🌝

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

यापूर्वी सपनाने इन्स्टाग्रामवर पती वीर साहूबरोबर करवाचौथ साजरा करतानाचे फोटो शेअर केले होते, जे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मुलाच्या जन्मानंतर वीर साहू यांनी सपना आणि त्यांच्या लग्नाचा खुलासा केला होता. जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर या दोघांनी यावर्षी जानेवारीत लग्न केले होते.

त्याचबरोबर, गरोदर राहिल्याच्या बातमीवरून सपनाला ट्रोल करणा-यांना खडे बोल सुनावत आपल्या लग्नाविषयी वीर साहू म्हणाले होते, ‘आम्ही दोन्ही कुटुंबांच्या संमतीने लग्न केले आहे. सपनाच्या संघर्षाचा मी आदर करतो आणि तिच्या कामात हस्तक्षेप करत नाही. आपले अपूर्ण राहिलेले प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी ती लवकरच कमबॅक करेल’, असेही ते म्हणाले