घरमनोरंजन'हा' अभिनेता म्हणतो सारा माझ्यापेक्षा सरस

‘हा’ अभिनेता म्हणतो सारा माझ्यापेक्षा सरस

Subscribe

केदारनाथ सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाविषयी आणि नव्याने पदार्पण करणाऱ्या साराच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा होत होती.

सारा अली खानने ‘केदारनाथ’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी छाप पाडू शकला नसला तरी तिच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुकच केले जात आहे. नुकतेच तिचे ‘सिंबा’ या आणखी एका सिनेमातील गाणे रिलीज झाले. ते गाणं सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे आणि पुन्हा एकदा या गाण्यामुळे साराचे कौतुकच होत आहे. पण एक कलाकार असा आहे ज्याने सारा माझ्यापेक्षाही सरस असल्याचे म्हटले आहे. हा कलाकार आणखी कोणी नसून साराचे वडील आणि अभिनेता सैफ अली खान आहे. साराला वडिलांकडून मिळालेली कौतुकाची ही थाप सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

वाचा- अर्शद बनला ‘फ्रॉड सैयाँ’, पाहा टिझर

काय म्हणाला बाबा सैफ?

केदारनाथ सिनेमा पाहिल्यानंतर सिनेमाविषयी आणि नव्याने पदार्पण करणाऱ्या साराच्या अभिनयाची सगळीकडे चर्चा होत होती. पण तिचा सिनेमा पाहिल्यानंतर सैफची काय प्रतिक्रिया होती हे देखील अनेकांना ऐकायचे होते. एका फॅशन वेबसाईटने घेतलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला की,

‘साराला प्रत्येक सिनेमातील सीन अगदी स्पष्ट होता. ही खूप चांगली गोष्ट आहे. कदाचित माझ्यापेक्षाही जास्त गोष्टी तिला कळतात. मी तिचा वयाचा असताना मला कदाचित या गोष्टी कळत देखील नव्हत्या. अभिनय क्षेत्रात येऊन करिअर करणं ही तिची निवड होती आणि तिने सिनेमात उत्तम काम केले आहे. या क्षेत्रात तिचे करिअर उज्वल आहेच. पण सगळ्यात महत्वाचे प्रेक्षक आहेत की ज्यांनी साराचे या क्षेत्रात स्वागत केले आणि तिला अभिनेत्री अशी ओळख दिली.’

- Advertisement -
COFFE WITH KARAN
कॉफी विथ करण कार्यक्रमात सारा अली खान आणि सैफ
हे माहीत आहे का? –अनुष्कासोबत लग्न केल्यानं माझं आयुष्यच बदललं – विराट

आता ‘सिंबा’ची तयारी

केदारनाथनंतर आता सिंबाच्या प्रमोशनमध्ये सारा व्यग्र आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला लोकांची पसंती मिळाली आहे. करण जोहर या सिनेमाचा प्रोड्युसर असून या सिनेमातील रिमिक्स गाणं सध्या हिट होतयं. अर्शद वारसीच्या आँख मारे’ या गाण्याचे हे रिमेक असून यात गोलमाल ५ च्या टीमने कॅमिओ केला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -