Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर मनोरंजन Video: माधुरी दीक्षितच्या ‘या’ गाण्यातील सरोज यांची कोरिओग्राफी ठरली अखेरची

Video: माधुरी दीक्षितच्या ‘या’ गाण्यातील सरोज यांची कोरिओग्राफी ठरली अखेरची

आवडती शिष्या माधुरी दीक्षितसाठी केलेले नृत्य दिग्दर्शन हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ठरेल असे वाटले नव्हते.

Mumbai

दिग्गज कोरियोग्राफर सरोज खान यांनी शुक्रवारी या जगाला निरोप दिला, ज्याने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला लयबद्ध केले. सरोज खान यांनी मुंबईतील गुरु नानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी सरोज खान यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना गुरु नानक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. परंतु शुक्रवारी पहाटे १.५२ वाजता सरोज खान यांनी अखेरचा श्वास घेतला.

सरोज खान यांनी अनेक सेलिब्रिटींना नृत्याचे प्रशिक्षण दिले आणि चित्रपटातील गाण्यामध्ये नृत्याचे दिग्दर्शन देखील केले आहेत. माधुरी दीक्षित ही त्यांची आवडती नर्तक शिष्या होती. धक धक, डोला रे डोला, एक दो तीन अशी माधुरीची बरीच गाणी सरोज खान यांनी कोरिओग्राफ केली होती. परंतु, योगायोग म्हणजे त्यांनी आवडती शिष्या माधुरी दीक्षितसाठी केलेले नृत्य दिग्दर्शन हे त्यांच्या आयुष्यातील शेवटचे ठरेल असे वाटले नव्हते.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या करण जोहर यांच्या कलंक या चित्रपटात माधुरी दीक्षितवर ‘तबाह हो गए’ हे गाणं चित्रित करण्यात आले होते, या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी माधुरी दीक्षितवर केले होते.

मात्र, माधुरी दीक्षितच्या ‘तबाह हो गए’ या गाण्यातील सरोज यांची कोरिओग्राफी अखेरची ठरेल, असे सरोज खान यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या शिष्यांना कधीच वाटले नव्हते.


प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन