घरमनोरंजन'सविता दामोदर परांजपे'ची झलक

‘सविता दामोदर परांजपे’ची झलक

Subscribe

जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून स्वप्ना वाघमारे जोशी या दिग्दर्शिका आहेत. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

मराठी सिनेमा हा नेहमीच उत्तम आशय आणि विषयासाठी ओळखला जातो. त्यामुळं मराठी चित्रपटांच्या प्रेमात हिंदीतले अनेक निर्मातेही आहेत. या यादीमध्ये आता अभिनेता जॉन अब्राहम यांचे नाव दाखल झाले असून त्यांची पहिली निर्मिती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाची पहिली झलक नुकतीच दाखवण्यात आली आहे. ‘गेल्या काही वर्षांत मराठीत उत्तमोत्तम आशयाचे चित्रपट बनत आहेत. त्यामुळे मी स्वतःही एका मराठी चित्रपटाची निर्मिती करतोय याचा मला आनंद आहे. प्रादेशिक सिनेमांचं आशयावर भर देऊन काम करणं मला आवडतं. एका चांगल्या संकल्पनेसोबतच ताकदीचे कलाकार आणि उत्तम दिग्दर्शक या सगळ्यांमुळे वेगळ्या धाटणीचा ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास जॉन अब्राहमनं यावेळी व्यक्त केला आहे.

सुबोध – राकेश आणि तृप्तीची दमदार अभिनय

‘सविता दामोदर परांजपे’ या गाजलेल्या नाटकावर चित्रपट करण्याचे बरेच दिवसांपासून मनात होते. सगळे योग जुळून येत हा चित्रपट साकारल्याचे, दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी सांगितलं. या निर्मितीदरम्यान जॉनचा सहभागही तितकाच महत्त्वपूर्ण ठरल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे. ‘एका उत्तम संहितेवर बेतलेल्या या चित्रपटाचा भाग होण्याची संधी मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो’, अशी भावना अभिनेता सुबोध भावे यांनी व्यक्त केली तर ‘सविता दामोदर परांजपे’ ही रीमाताईंनी अजरामर केलेली भूमिका मला साकारायला मिळाल्याने एकाचवेळी आनंद आणि जबाबदारी अशी दुहेरी भावना मनामध्ये असल्यांच तृप्ती तोरडमलनं मत व्यक्त केलं. आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका या चित्रपटामध्ये साकारल्याचे अभिनेता राकेश बापटनं सांगितलं आहे. सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. येत्या ३१ ऑगस्टला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -