घरताज्या घडामोडी'त्या एका गोष्टीमुळे अनेक प्रोजेक्ट हातातून गेले', 'या' अभिनेत्रीने सांगितला अनुभव

‘त्या एका गोष्टीमुळे अनेक प्रोजेक्ट हातातून गेले’, ‘या’ अभिनेत्रीने सांगितला अनुभव

Subscribe

या अभिनेत्रीने बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिर्झिया या चित्रपटाने केली होती.

अनुराग कश्यपच्या ‘चोक्ड: पैसा बोलता है’ या शॉर्टफिल्मुळे चर्चेत असलेली अभिनेत्री सयामी खेरचा विश्वास आहे की सिनेमांमध्ये येण्यापूर्वी एकदा तरी प्रत्येकाने अपयशी ठरलं पाहिजे. सयामी म्हणाली की तिचा पहिला चित्रपट मिर्झिया जेव्हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला तेव्हा वाटलं आता सगळच संपलं. त्यामुळे त्या काळात मला समजले की बॉलीवूडमध्ये अभिनय करिअर करण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या खूप सक्षम असणे गरजेचे आहे. कारण या व्यवसायात बर्‍याच वेळा तुम्हाला अपयशही येते.

- Advertisement -

मिर्झिया या चित्रपटानंतर माझे दोन प्रोजेक्ट रिलीज होणार होते, परंतु चित्रपट फ्लॉप झाल्यावर तस काही घडलं नाही. यापैकी एक प्रकल्प मणिरत्नम यांच्याबरोबर होता तर दुसर्‍या प्रोजेक्टमध्येही मला बदलण्यात आलं. कारण माझा मिर्झिया ही चित्रपट चालला नव्हता. ही इंडस्ट्री असच काम करते.

- Advertisement -

विशेष म्हणजे सयामीने तिच्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरुवात राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या मिर्झिया या चित्रपटाने केली होती. या चित्रपटाद्वारे अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरनेही बॉलिवूड कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर सयामीला काही ऑफर्स आल्या पण ती एक आव्हानात्मक भूमिकेच्या शोधात होती. अशाप्रकारे, त्यांनी २०१८ मध्ये मौली या मराठी चित्रपटात काम केलं. या चित्रपटात तीच्यासोबत रितेश देशमुख दिसला होता.

सयामी म्हणाली, मिर्झियृ नंतर मला काही ऑफर्स आल्या पण कोणत्याही चित्रपटात काम करण्याचा मला उत्साह नव्हता. मी शेवटी मौली चित्रपटात काम केले तरी. या चित्रपटाद्वारे मी मराठी चित्रपटांत पदार्पण केले. या चित्रपटात मी एक अशी भूमिका केली होती ज्याबद्दल कोणी विचार करू शकत नाही.


हे ही वाचा – चीन नाही ओ..तर ‘या’ देशाने पसरवला कोरोना जगभर, डॉक्टरांनी केला दावा!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -