घरमनोरंजन#metoo : राणीच्या वक्तव्यावर कंगनाने दिली 'ही' प्रतिक्रिया!

#metoo : राणीच्या वक्तव्यावर कंगनाने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!

Subscribe

‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्री कंगना रणौटने #metoo मोहीमेवर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री राणी मुखर्जीने काही दिवसांपूर्वी यावर एक वक्तव्य केले होते यावर आधारित ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

#metoo मोहीम बॉलिवूडमध्ये सुरु करून अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा अमेरिकेला गेली असली तरीही अजूनही #metoo ची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरुच आहे. #metoo मोहीमेअंतर्गत अनेक बॉलिवूड कलाकारांवर आरोप लागले आहेत. यातील अनेक प्रकरणी फक्त आरोप लावण्यात आले मात्र अजूनही सिद्ध झाले नाही. अशातच बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने #metoo मोहीमेवर वक्तव्य केले होते. राणीने चित्रपट समीक्षक राजीव मसंद याच्या राऊंड टेबल काँफरन्समध्ये हे वक्तव्य केलं होतं. यानंतर राणीच्या या वक्तव्याचा विरोध करण्यात आला असून सोशल मीडियावरही तिला ट्रोल करण्यात आले होते. दरम्यान कंगनाला हाच प्रश्न चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विचारण्यात आला होता. 

काय म्हणाली होती राणी

राणी म्हणाली होती की,”अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून  महिलांनी आतूनच सशक्त असणे गरजेचे आहे. जर त्यांचे शोषण झाले तर त्यांनी त्याचा विरोध केला पाहिजे. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर विश्वास ठेवला पाहिजे ज्यामुळे ते आपली सुरक्षा स्वतः करू शकतील. शेवटी आपली सुरक्षा ही आपल्याच हातात आहे.”

 

View this post on Instagram

 

#manikarnika #jhansikirani??

A post shared by Kangnaranaut (@kangnaranaut_fc) on

- Advertisement -

काय म्हणाली कंगना

राणीच्या या वक्तव्यावर कंगना प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की,”महिलांना सशक्त करणे आणि त्यांचे समर्थन करण्याची आवश्यकता आहे. आजच्या समाजातील मुली राणी लक्ष्मी बाई सारख्या धाडसी आणि निर्भिड आहेत. त्यांना आपण कमी लेखणे हे योग्य नाही. मी माझ्या जीवनातील पहिली तक्रार १६ वर्षाची असताना नोंदवली होती. माझ्यावरही लैंगिक अत्याचार झाला होता. सर्व मुली आपले मत स्वतः माडू शकतात आपल्याला त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. ज्या ठिकाणी गरज आहे त्याच ठिकाणी त्यांना हिम्मत देणे आवश्यक आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -