घरमनोरंजनज्युनिअर शहारूख पदार्पणासाठी सज्ज; वडिलांसह करणार डेब्यू

ज्युनिअर शहारूख पदार्पणासाठी सज्ज; वडिलांसह करणार डेब्यू

Subscribe

या चित्रपटाच्या निमित्ताने वडील-मुलाची दमदार केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

बॉलिवूड विश्वातील किंग खान म्हणजे अभिनेता शहारूख खान त्याच्या चित्रपटातील अभिनयाने प्रत्येकांच्या मनावर भुरळ घातली आहे. मात्र आता या शर्यतीत आता त्याचा मुलगाही सहभाग घेणार असल्याच्या चर्चा आहे. शहारूख खानचा मुलगा आर्यन खान लवकरच चित्रपट विश्वात पदार्पण करणार आहे. या संदर्भातील माहिती शहारूख खान आणि वॉल्ट डिजनीच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्ट केली.

- Advertisement -

‘द लायन किंग’ या चित्रपटात शहारूख खान आपल्या मुलासह ‘सिंबा’ आणि ‘मुफासा’च्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. स्टार किड्सच्या चर्चेत नेहमी आर्यन खान नेहमी नंबर वनवर असतो. मात्र आर्यन खानच्या चित्रपटातील एण्ट्रीमुळे सध्या आर्यन खानच्याच नावाची चर्चा आहे. नुकताच शहारूख खानने सोशल मीडियावरून एक फोटो शेअर केला होता, त्या फोटोमध्ये शहारूखसह त्याचा मुलगा आर्यन ‘मुफासा’ आणि ‘सिंबा’ असे नावं लिहीलेल्या भारताच्या जर्सीमध्ये बघायला मिळाले. हा व्हायरल होणारा फोटो फादर्स डे च्या दिवशी शेअर करण्यात आला होता.

- Advertisement -

हॉलिवूडचा ‘द लायन किंग’ हा चित्रपट १७ जुलै रोजी जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इग्लिश, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेत प्रदर्शित होणार असून या चित्रपटात वडिल ‘मुफासा’ च्या भूमिकेत शहारूख खान तर ‘सिंबा’च्या भूमिकेत आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने वडील-मुलाची दमदार केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

View this post on Instagram

Hair vs Gravity

A post shared by Aryan Khan (@___aryan___) on

शहारूख खानचा मुलगी आर्यन खान चित्रपटाव्यतिरिक्त ही नेहमीच चर्चेत असतो. आर्यन खानचे फोटो असो किंवा व्हिडिओ दोन्हीही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यापुर्वी आर्यनने बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर यांच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात शहारूख खानच्या बालपणीची भूमिका साकारली होती. यासोबतच तख्त या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -