Video : शाहरुख-ब्राव्होचा भन्नाट ‘लुंगी डान्स’

नेहमी चर्चेत असलेला वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होचा डान्स पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे. त्याने हा डान्स बॉलिवूडच्या किंग खानसोबत केला आहे.

Mumbai
shah rukh khan crazy lungi dance with dwayne bravo
Video : शाहरुख-ब्राव्होचा भन्नाट 'लुंगी डान्स'

सोशल मीडियावर वेस्ट इंडिजचा डान्स व्हिडिओ हा तुफान व्हायरल होत असतो. सध्या असाच एका पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि वेस्ट इंडिज संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो हे दोघे या पार्टीमध्ये ‘लुंगी डान्स’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ही पार्टी एका बोटीत करण्यात आली आहे. ब्राव्होने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या अगोदर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळाल्यानंतर मैदानावर सेलिब्रेशन देखील सगळ्या क्रिकेटप्रेमींना ध्यानात असेल. ‘डिजे ब्राव्हो’ या गाण्यावरील ब्राव्होचा डान्स हा खूपच चर्चेत आला होता.


नक्की वाचारानूच्या मुलीचा आवाज तुम्ही ऐकला का?; माय-लेकींचा व्हिडिओ व्हायरल


३५ व्या वर्षी ब्रोव्हाने ऑक्टोबर २०१८ मध्ये सर्व क्रिकेटप्रेमींना धक्का बसले असा तडकाफडकी निर्णय घेतला. ब्राव्होने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

ब्राव्होने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चांगलीच कामगिरी केली आहे. त्याने १६४ एकदिवसीय सामन्यात २ हजार ९६८ धावा आणि १९९ गडी बाद केले होते. टी २० कारकिर्दीमध्ये त्याने ६६ सामन्यात १ हजार १४२ धावा केल्या आणि ५२ बळी टिपले होते. तसेच कसोटी कारकीर्दीत ब्राव्होने ४० सामन्यात २ हजार २०० धावा आणि ८६ गडी बाद केले होते. असा ब्राव्होचा क्रिकेट विश्वातील प्रवास होता.


हेही वाचाVideo: ‘द स्काय इज पिंक’चा ट्रेलर रिलीज