घरमनोरंजनVideo: किंग खानच्या मुलीचा डेब्यू चित्रपट रिलीज

Video: किंग खानच्या मुलीचा डेब्यू चित्रपट रिलीज

Subscribe

सुहानाची ही शॉर्ट फिल्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून हा व्हिडिओ तिच्या फॅनक्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे

बॉलिवूडचा बादशाह आणि किंग खान शाहरूख खानची मुलगी सुहाना खानचा पहिला डेब्यू चित्रपट ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू (The Grey Part Of Blue)’ हा नुकताच रिलीज झाला आहे. सुहानाच्या या पहिल्या वहिल्या शॉर्ट फिल्ममधील अभिनयाचे चांगलेच कौतुक होत आहे. सुहानाची ही शॉर्ट फिल्म इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असून हा व्हिडिओ तिच्या फॅनक्लबने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून शहारूख खानची मुलगी सुहाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार अशा चर्चा रंगताना दिसत होत्या. मात्र नुकताच तिची शॉर्ट फिल्म रिलीज झाल्याने या चर्चा थांबल्या असून तिच्या अभिनय आणि पदार्पणाचे कौतुक केले जात आहे.

- Advertisement -

अशी आहे शॉर्ट फिल्म

या अवघ्या दहा मिनिटाच्या असणाऱ्या शॉर्ट फिल्ममध्ये तिने उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला आहे. सुहानाची ही शॉर्ट फिल्म एका प्रेमकथेभोवती आधारलेली आहे. या फिल्ममध्ये तिने रोबिन गोने ही व्यक्तिरेखा साकारली आहे. दोन दिवसांच्या ट्रिपमध्ये त्यांच्या नात्यातील आपलेपणा, खरेपणा चित्रपटाच्या माध्यमातून दिसून येते. सुहानाच्या पहिल्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप आनंद बघायला मिळत आहे. या शॉर्ट फिल्ममध्ये सुहाना मुख्य भूमिकेत दिसत आहे.

View this post on Instagram

?

A post shared by Suhana khan (@suhana_khan_officiall) on

सुहानाने आपले ग्रेज्युएशन पुर्ण केले असून पुढच्या शिक्षणाकरता सध्या न्यूयॉर्कमध्ये राहत आहे. तिच्या या शॉर्ट फिल्ममुळे ती सध्या चर्चेत असली तरी तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -