सध्या सगळे लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं, मतदानासाठी जनजागृती व्हावी यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपल्यापरीने प्रयत्न करतोय. यात बॉलिवूडचे कलाकारही मागे नाहीयेत. बॉलिवूडचा दबंग खान,मिस्टर परफेक्टनिस्ट अमिर खान यांनी सगळ्यांना मतदानाचं आवाहन केल्यानंतर आता बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खाननेही मतदान जागृतीसाठी खास रॅप साँग तयार केलं आहे.
PM sahib @narendramodi ne creativity ki liye bola tha. Main thoda late ho gaya video banane mein…aap mat hona Vote karne mein!!! ‘Voting is not only our Right, it is our Power.’ Please Use It. Thank u to @tanishkbagchi @abbyviral @parakramsinghr . https://t.co/9280i8BnK3
— Shah Rukh Khan (@iamsrk) April 22, 2019
शाहरूखचं भन्नाट रॅप साँग
शाहरूखने संपूर्ण जनतेला एका भन्नाट रॅप साँगमधून मतदान करा असं अवाहन केलं आहे. ‘इट्स टाईम टो व्होट’ असं म्हणत शाहरूखने मतदानाचं अवाहन केलं आहे. हसत,खेळत धम्माल व्हीडीओमधून मतदानाचं महत्त्व त्याने सांगितलं आहे. मतदान आपल्यासाठी किती गरजेचं आहे हे शाहरूखने या व्हीडीओत सुंदर मांडलं आहे.
हा व्हीडीओ ट्वीटरवर शेअर करताना शाहरूखने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केलं आहे. शाहरूख म्हणतो, मोदी साहेब तुम्ही क्रिएटीव्हपणे मतदानाचं आवाहन करा असं म्हणाला होता. मला थोडा उशीर झाला आहे. पण तुम्ही मतदानकरायला उशीर करू नका. मतदान हा तुमचा केवळ हक्क नाही तर खरी ताकद आहे. धन्यवाद.
T 3117 – आदरणीय @narendramodi जी .. 900 million voters, 543 winners. Every vote is for supremacy of Constitution. Constitution is Holy book of democracy. About 600 million voters of 900 m, less than 35 yrs. Young ask questions about tomorrow not yesterday ! VOTE FOR TOMORROW ! pic.twitter.com/CnnFKNxsKQ
— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 13, 2019
मोदींच सेलेब्रेटींना अवाहन
निवडणूकी आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत बॉलिवूड सेलेब्रेटींना, मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन करा. असे अवाहन केले होते. मोदींच्या अवाहनानंतर अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांनी ट्वीटरच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्याचे अवाहन केले.
Well said @narendramodi ji. The true hallmark of a democracy lies in people’s participation in the electoral process. Voting has to be a superhit prem katha between our nation and its voters 🙂 ?? https://t.co/rwhwdhXj1S
— Akshay Kumar (@akshaykumar) March 13, 2019