शाहीद कपूर आणि मिराच्या ‘मुलाचे’ नाव काय?

शाहीद कपूर आणि मिरा राजपूर यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असून, 'मिशा' प्रमाणेच त्यांच्या मुलाचे नावही खास असणार का? याची सर्वांनाचा उत्सुकता आहे.

Mumbai
shahid kapoor and mira rajput blessed with baby boy
शाहीद कपूर आणि मिराच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन (फाईल फोटो)

अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मिरा राजपूत, यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. गुरुवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास हिंदुजा रुग्णालयामध्ये मिराने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यामुळे सध्या शाहीद कपूर आणि मिरा पुन्हा एकदा आई-बाबा होण्याचं सुख अनुभवत आहेत. या जोडप्याला मिशा नावाची २ वर्षांची मुलगीसुद्धा आहे. उपलब्ध माहितीनुसार, ‘मिशा’चं नाव शाहीद मधील ‘शा’ आणि मिरा मधली ‘मि’ ही दोन अक्षरं एकत्र करुन ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे आता शाहीद आणि मिरा त्यांच्या मुलाचे नाव काय ठेवणार? याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता ताणली गेली आहे. या गोड बातमीमुळे कपूर आणि राजपूत परिवारांमध्ये आनंदाचे वातावरण असणार यात काहीच शंका नाही. दरम्यान या गोड बातमीनंतर ‘बी-टाऊन’ मधून तसंच जगभरातील चाहत्यांकडून शाहिद आणि मिरा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक शाहीद-मिराला भरभरुन शुभेच्छा देताना दिसत आहेत.

 सौजन्य- Twitter Moments India

shahid anf mira with misha
शाहीद कपूर आणि मिरा राजपूत, कन्या मिशासोबत (सौजन्य-ट्वीटर)