Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन रागावलेल्या बायकोला मनवण्यासाठी शाहिद म्हणाला...

रागावलेल्या बायकोला मनवण्यासाठी शाहिद म्हणाला…

शहिद आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वेगळी आणि हटके भूमिका घेऊन येत आहे. पण त्याच्या बायकोला मात्र त्याची ही भूमिका फारशी आवडलेली नाहीय

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर नेहमीच त्याच्या चाहत्यांसाठी सुपर हिट सिनेमे देत असतो. शाहिद सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. शाहिद कपूर सध्या चांगलाच चर्चेत आलाय तो म्हणजे त्यांच्या एका इंन्स्टाग्राम पोस्टमुळे. शाहिदचा कबीर सिंग या सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. शहिद आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वेगळी आणि हटके भूमिका घेऊन येत आहे. पण त्याच्या बायकोला मात्र त्याची ही भूमिका फारशी आवडलेली नाहीय असे दिसतय. शाहिदची बायको मीरा हिला शाहिदने वेगळ्या धाटणीचे सिनेमे करावे असे वाटय. त्याबद्दल शाहिदने त्याच्या इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिलीय आणि ती पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

‘माझी बायको माझ्यावर रागावली आहे. कारण मी मसाला सिनेमे करत नाही. ज्यामध्ये मी मनमुराद नाचू शकतो. त्यामुळे मी विनंती करतो की यापुढे मला अशाच सिनेमांसाठी विचारा ज्यात मी मनसोक्त नाचू शकतो आणि माझ्या पत्नीला खूश ठेवू शकतो’, असे मजेशीर कॅप्शन देत शाहिदने फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट सद्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. मीरानेही यावर अविश्वसनीय अशा रिप्लाय दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shahid Kapoor (@shahidkapoor)

- Advertisement -

शाहिदचा कबीर सिंग हा सिनेमा हिट झाला. आता त्यानंतर तो ‘जर्सी’ या नव्या सिनेमाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमात शाहिद एका क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. एका साऊथ इंडियन सिनेमाचा हा रिमेक असणार आहे. त्यामुळे कबीर सिंग नंतर आता शाहिदच्या चाहत्यांना त्याच्या नव्या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहेत. काही दिवसांपूर्वी शाहिदने जर्सीच्या टिमचे आभार मानण्यासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर केली होती. कोरोनामुळे सिनेमाचे शुटींग ४७ दिवसात करावे लागले. फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेतो त्याचप्रमाणे आमच्या टिमने काम केले असे शाहिदने त्या पोस्टमध्ये म्हटले आहे. जर्सी या सिनेमाचे शुटींग संपले असून हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहिद सोबत मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

- Advertisement -