शाहरूखच्या घरात राहयला जायचंय तर द्या ‘या’ प्रश्नाचं उत्तर

गौरी खान कडून वयक्तिक आमंत्रण देण्यात येणार आहे.

shahrukh khans fans can get a chance to stay at home
शाहरूखच्या घरात राहयला जायचंय तर द्या या प्रश्नाचं उत्तर

बॉलिवुडच्या सुपरस्टारर्सना पाहण्यासाठी चाहते त्यांच्या घराखाली नेहमीत गर्दी करत असतात. बॉलिवुडचा किंग खान म्हणजेच शाहरूख खान. शाहरूखला पहायला त्याचे फॅन्स नेहमी त्याच्या घराखाली गर्दी करतात. शाहरूखचे आलिशान घर आतून नक्की कसे आहे ? हा प्रश्न प्रत्येकालाच पडत असतो. त्यांच्या चाहत्यांचे हे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. शाहरूखचा बंगला आतून पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. याबाबतची माहिती गौरी खानने तिच्या सोशल मीडियावरून शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने गौरी खानने चाहत्यांसाठी ही घोषणा केली आहे. शाहरूखच्या दिल्लीतील बंगल्यात व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता. पण त्याआधी तुम्हाला एक स्पर्धा खेळावी लागणार आहे. शाहरूख आणि त्याची पत्नी गौरी खान हिने एआर बीएनबी (Air bnb) या घर मिळवून देणाऱ्या एका संस्थेशी करार केला आहे. त्यासंदर्भात एक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात शाहरूखच्या चाहत्यांना ३० नोव्हेंबर पर्यंत एका प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे.

‘ओपन आर्म वेलकम’ म्हणजेच दिलखुलास स्वागत करणे म्हणजे काय ? या प्रश्नाचे प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. ज्या चाहत्याचे उत्तर सर्वात क्रिएटिव्ह असेल त्याला शाहरूखच्या बंगल्यात राहण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १८ नोव्हेंबर पासून होणार आहे. या स्पर्धेत फक्त भारतीय लोकांनाच सहभाग घेता येणार आहे. स्पर्धेत जिंकणाऱ्या जोडप्याला १३ फेब्रुवारी २०२१ला शहारूखच्या या आलिशान बंगल्यात राहण्याची संधी मिळणार आहे.

 

विजेत्यांना मिळणार या सुविधा आणि आकर्षक भेटवस्तू

विजेच्या जोडप्याला शाहरूख खानच्या दिल्लीतील पंचशील पार्क येथील बंगल्यात राहण्याची संधी मिळणार आहे. राहण्याच्या संपूर्ण वेळेत त्याना आलिशान गाडी तसेच विमानतळावर पिक आणि ड्रॉपही मिळणार आहे. गौरी खान कडून वयक्तिक आमंत्रण देण्यात येणार आहे. विजेत्या जोडीला खान कुटुंबियांच्या आवडीचे जेवण तसेच शाहरूखचे आवडते सिनेमा पाहण्याची संधी मिळणार आहे. खान कुटुंबाकडून विजेत्या जोडीला स्मृतीचिन्ह आणि आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

शाहरूख आणि गौरी खान यांच्या आयुष्याचा प्रवास हा दिल्लीच्या पंचशील पार्क येथील बंगल्यातून सुरू झाला. दिल्लीच्या या बंगल्याचे इंटिरिअर डिझाइन गौरी खानेने स्व:ता केले आहे. ‘गेल्या ३० वर्षांपासून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रवासाचे हे घर साक्षीदार आहे, असे गौरी खान हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


हेही वाचा – लवकरच ‘टॉम अँड जेरी’ नव्या ट्विस्टसह प्रेक्षकांच्या भेटीला, ट्रेलर पाहून चाहते झाले इमोशनल