माझ्या घराइतका मोठा शाहरूखचा वॉर्डरोब – आमिर खान

आमिर खान सध्या 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शाहरूखची भरभरून स्तुती आमिर खानने केली आहे.

Mumbai
aamir-khan
आमिर खान (सौजन्य - फर्स्टपोस्ट)

दिवाळीच्या मुहूर्तावर आमिर खानचा बहुचर्चित ठग्ज ऑफ हिंदुस्तान प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने रविवारी आमिर खानने आपल्या घरी काही पत्रकारांची भेट घेतली. आमिरच्या या चित्रपटासाठी काही वेगळे प्रमोशनचे फंडेही वापरण्यात आले आहेत. गुगल मॅपवर आमिरची व्यक्तिरेखा रस्ताही दाखवणार आहे. या भेटीदरम्यान आमिरला शाहरूखच्या आगामी झिरोबद्दलही प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा आपल्याला या चित्रपटाचे ट्रेलर खूपच आवडल्याचे आमिरने सांगितले. शाहरूखची एनर्जी खूपच मस्त असल्याचंही आमिरनं यावेळी म्हटलं आहे.

मी स्टार नाही

मला वाटतं मी स्टार नाही. मला तसं कधीच वाटत नाही आणि माझे कपडेही कधी तशा प्रकारचे नसतात. माझे मॅनेजर्स पण मला खूप वेळा सांगतात की, खास क्षणी किंवा सणाच्या वेळी मस्त सजून राहायला हवं, जसं की आता दिवाळीचा सण आला आहे. तेव्हा मी त्यांचं म्हणणं मानतो. पण मला खरंच साधी जीन्स वा अगदी ३/४ पँटमध्ये खूपच कम्फर्टेबल वाटतं. पण याबाबतीत शाहरूख अतिशय मस्त माणूस आहे. तो नेहमी खूप छान तयार होतो. त्याच्या शूजपासून ते अगदी बेल्ट आणि कपड्यांपर्यंत सर्वच खूप व्यवस्थित असतं. मी त्याचा वॉर्डरोब पाहिला आहे. खरं तर माझ्या घराइतका मोठा तर त्याचा वॉर्डरोब आहे, याला म्हणतात स्टार, अशी शाहरूखची स्तुती यावेळी आमिरने केली.

आमिरने केली शाहरूखची स्तुती

वास्तविक पत्रकारांशी बोलताना आमिरने मरून रंगाचा कुरता घातला होता. तेव्हाच त्याला हा प्रश्न विचारला असता त्याने शाहरूखची भरभरून स्तुती केली. सध्या आमिर ठग्ज ऑफ हिंदुस्तानच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच अमिताभ बच्चनबरोबर आमिर काम करत आहे. तर याशिवाय कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय कृष्ण आचार्यने केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here