घरमनोरंजनशाहरुख-सलमान 'टेलिव्हिजनवर' पुन्हा एकत्र..

शाहरुख-सलमान ‘टेलिव्हिजनवर’ पुन्हा एकत्र..

Subscribe

शाहरुख खान आणि सलमान खान 'झिरो' सिनेमात एकत्र झळकणार अाहेतच. मात्र, त्याआधी हे दोन्ही सुपरस्टार टेलिव्हिजनवर एकत्र येणार आहेत.

शाहरुख खान आणि सलमान खान या सुपरस्टार्सचे जगभरात करोडो चाहते आहेत. या दोन्ही अभिनेत्यांचे चाहते त्यांच्या  प्रत्येक नवीन येणाऱ्या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातही सलमान आणि शाहरुख जर एकाच सिनेमात असतील तर मग पाहायलाच नको. असा सिनेमा दोघांच्या चाहत्यांसाठी अानंदाची पर्वणीच म्हणावा लागेल. लवकरच अशी संधी प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. शाहरुखच्या आगामी ‘झिरो’ या सिनेमात सलमानचा कॅमिओ असणार आहे. तर सलमान खानच्या ‘भारत’ या आगामी सिनेमात शाहरुख कॅमिओ करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, मोठ्या पडद्यावर एकत्र झळकण्याआधी ही जोडी टेलिव्हिजनवर पुन्हा एकदा एकत्र येते आहे.

प्रमोशनसाठी कायपण…

शाहरुख आणि सलमान  हे दोघेजण पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र येण्यासाठी सज्ज झाले आहेत. सूत्रांनुसार शाहरुख लवकरच सलमानच्या शोमध्ये हजेरी लावणार आहे. सोनी चॅनेलवरील सलमान खानच्या ‘दस का दम’ या शोचा सध्या सगळीकडे बोलबोला आहे. शाहरुख खान त्याच्या ‘झिरो’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी, दस का दम शोमध्ये हजेरी लावणार असल्याचे समजते आहे. यानिमित्ताने दोन्ही सुपरस्टारचा जलवा पुन्हा एकदा टेलिव्हिजनवर पाहायला मिळेल. याआधीही शाहरुख त्याच्या ‘दिलवाले’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमानच्या बीग बॉस शोमध्ये गेला होता. त्याहीवेळी प्रेक्षकांना या दोघांची धमाल अनुभवायला मिळाली होती.

- Advertisement -
SRK_Salman
सौजन्य- सोशल मीडिया

दरम्यान शाहरुख खानचा झिरो सिनेमा ३१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, झिरोमधील सलमान खान असलेलं गाणं याआधीच रिलीज झालं आहे. सोशल मीडियावर या गाण्याला नेटिझन्सची भरभरुन पसंती मिळते आहे. या निमित्ताने नजर टाकूया सलमान आणि शाहरुख यांनी एकत्र काम केलेल्या काही निवडक सिनेमांवर –

  • करण – अर्जुन (१९९५)
  • दुश्मन दुनिया का (१९९६)
  • कुछ कुछ होता है (१९९८)
  • हम तुम्हारे है सनम (२००२)

याशिवाय गेल्या वर्षी येऊन गेलेल्या सलमानच्या ट्युबलाईट सिनेमामध्येही शाहरुख खानने कॅमिओ केला होता.

- Advertisement -

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -