घरमनोरंजनमाधुरीमध्ये 'या' भूमिकेत दिसणार शरद केळकर

माधुरीमध्ये ‘या’ भूमिकेत दिसणार शरद केळकर

Subscribe

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे आहे. नुकताच सोनालीने या चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये सोनाली कुलकर्णीसोबत अभिनेता शरद केळकर, संहिता जोशी आणि अक्षय केळकर हे कलाकारही दिसत आहेत. सोशल मीडियावर या फर्स्ट लूक पोस्टरला चाहत्यांची पसंती मिळते आहे. याशिवाय ‘माधुरी-वय विचारू नका’ हे चित्रपटाचे मजेशीर नावही चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवत आहे.

एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणारा ‘माधुरी’

याचित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद या चित्रपटात प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या एका हटके रुपातून दिसणार आहे. नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्वरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

- Advertisement -

म्हणून झाली शरदची निवड

शरदच्या कास्टींगविषयी निर्माते मोहसीन अख्तर म्हणाले , “शरदने जे पात्र साकारलs आहे त्या पात्राविषयी मी फार विचार केला की, मी यासाठी कोणाला कास्ट करु शकतो. कारण हे पात्र प्रेमळ, हँडसम आणि हॉट आहे. शरदची आणि माझी खुप जुनी ओळख आहे. शरदचे काम मी पाहिले आहे. आणि त्यामुळे माझ्या पात्राच्या ज्या गरजा आहेत त्यात शरद एकदम फीट बसतो. शरदचा अभिनय, त्याचा आवाज, त्याचा लूक या सगळ्या गोष्टी फार कमाल आहेत आणि ‘माधुरी’ मध्ये शरदने अप्रतिम काम केलय.

- Advertisement -

उर्मिला मातोंडकरचे निर्माती म्हणून पदार्पण

विशेष म्हणजे ‘माधुरी-वय विचारू नका’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मराठी चित्रपटांच्या निर्मीती क्षेत्रात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वी उर्मिलाने या चित्रपटाची एक झलक रिलीज केली होती पण त्यामध्ये ‘माधुरी’ कोण? हे मात्र कळलं नव्हतं. दरम्यान सोनालीचा ‘माधुरी-वय विचारू नका’ हा चित्रपट ३० नोव्हेंबर २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे वाचा – ‘या’ स्टारकिडची मराठी चित्रपटसृष्टीत एंट्री!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -