घरमनोरंजनशशांक केतकर आणि नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र ‘आरॉन’ मधून!

शशांक केतकर आणि नेहा जोशी पहिल्यांदाच एकत्र ‘आरॉन’ मधून!

Subscribe

‘होणार सून मी त्या घरची’ या मालिकेत श्री ची भूमिका साकारणारा शशांक केतकर आणि ‘फर्जंद’ या चित्रपटातील रसिकांची लाडकी अभिनेती नेहा जोशी एकत्र ‘आरॉन’ मधून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत श्री ची भूमिका साकारणारा शशांक केतकर आणि अलीकडेच ‘वाडा चिरेबंदी’ या नाट्यत्रयीत आणि ‘फर्जंद’ या चित्रपटातील रसिकांची लाडकी अभिनेती नेहा जोशी आता पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीस येणार आहे. शशांक आणि नेहा एका आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन’ मधून एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. शशांक केतकर आणि नेहा जोशी हे दोघे पुणेकर आता पॅरिस मध्ये चित्रित झालेल्या ‘आरॉन’ चित्रपटामध्ये प्रथमच एकत्र येत आहेत. दोघांनीही अप्रतिम भूमिका निभावल्या असून एक आगळी वेगळी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती गिरीश नारायण पवार, कौस्तुभ लटके, अविनाश अहेर यांनी केली असून ओमकार रमेश शेट्टी यांनी दिग्दर्शनाची धुरा वाहिली आहे. ही अनोखी जोडी असलेला ‘आरॉन’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

शंशाक केतकरचे आयुष्यच पालटले

‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून शशांक केतकर चांगलाच चर्चेत आला आहे. शशांक केतकर आता महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. वन वे तिकीट आणि ३१ दिवस सारख्या चित्रपटांमधून दिसलेला शशांक केतकर आता आगामी मराठी चित्रपट ‘आरॉन’ मध्ये देखील पाहायला मिळणार आहे. हौसेखातर अभिनय करत असताना त्याचे व्यवसायात रूपांतर कधी झाले हे त्याला देखील कळले नाही. ऑस्ट्रेलियात अभियंत्याचे उच्च शिक्षण घेत असताना तो हौसेखातर सांस्कृतिक कार्यक्रमांतून अभिनय करायचा. पुढे भारतात परतल्यावर पुण्यात त्याने अभिनयक्षेत्रातच काम करायचे ठरवले. नाटक, मालिका केल्या परंतु ‘होणार सून मी त्या घरची’ ने त्याचे आयुष्यच पालटून टाकले.

- Advertisement -

नेहा दिसणार एका वेगळ्या भूमिकेत

पुण्यात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा गाजविणारी नेहा जोशी हिला ‘क्षण एक पुरे’ या व्यावसायिक नाटकाने मनोरंजनसृष्टीत आणले. २००० साली तिला ‘ऊन पाऊस’ ही मालिका मिळाली आणि ती महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. मालिका, नाटकं, चित्रपट यातून चतुरस्त्र भूमिका करत तिने आपले स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. झेंडा, सुंदर माझे घर, पोश्टर बॉईझ, पोश्टर गर्ल, लालबागची राणी हे तिचे काही चित्रपट चांगले गाजले. आता ती पुन्हा एकदा ‘आरॉन’ मधून वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.


वाचा – ‘या’ मराठी चित्रपटात फ्रेंच कलाकार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -