घरमनोरंजनशिबानी आणि फरहानचं ठरलं!

शिबानी आणि फरहानचं ठरलं!

Subscribe

सुरुवातीच्या काळात आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे ठामपणे सांगणारी या जोडीने कालांतराने आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले

बॉलीवूडची हॉट जोडी शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तर हे त्यांच्यातील नात्यामुळे कायम चर्चेत असतात. दोघांचं एकमेकांबरोबर वेळ घालवणं, फिरायला जाणं नेहमीच चर्चेत राहतं. आता तर दोघेही लग्नगाठ बांधणार असल्याची माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

शिबानी-फरहान ही बॉलीवूडमधील सध्याची हॉट जोडी आहे. दोघांनासुद्धआ आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सुट्टीवर जायला आवडतं. एवढंच नाही तर दोघेही आपल्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

- Advertisement -

सुरुवातीच्या काळात आम्ही केवळ चांगले मित्र आहोत, असे ठामपणे सांगणारी या जोडीने कालांतराने आपण रिलेशनशीपमध्ये असल्याचे कबूल केले. तेव्हापासून ही जोडी विवाहबंधनात कधी अडकणार अशी चर्चा रंगली आहे.

मात्र एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार बॉलीवूडची ही हॉट जोडी पुढील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये लग्नाच्या बेडीत अडकण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून दोघंही आपल्या नात्याबद्दल गांभीर्याने विचार करत आहेत. एवढेच नाही दोघांनासुद्धा लग्न करण्याची इच्छा असल्याचे सुद्धा या वृत्तात म्हटले आहे.

View this post on Instagram

oh Hi @faroutakhtar ??‍♀️ #bumped

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar) on

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -