शिल्पा शेट्टी पुन्हा ‘त्या’ फोटोवरुन ट्रोल!

खरंतर शिल्पा शेट्टीचा 'हा' फोटो काहीसा जुना आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नेटिझन्सनी पुन्हा एकदा याच फोटोवरुन तिला ट्रोल केलं आहे.

Mumbai
shilpa shetty trolled
सईचा ग्लॅमरस अंदाज

बॉलीवूड सेलिब्रिटीज काही ना काही कारणामुळे ट्रोल होणं, ही बाब काही नवीन नाही. बी-टाऊन सेलिब्रिटीजची छोट्यात छोट्यात चूक ही सोशल मीडियावर कधी मोठ्या चर्चेचा विषय बनेल सांगता येत नाही. त्यामुळे बरेचदा स्वत:च्या एखाद्या कृतीमुळे किंवा वक्तव्यामुळे बॉलीवूड सेलिब्रिटी चांगलेच ट्रोल होतात. अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबतही सध्या असंच काही होत आहे. नुकताच शिल्पाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या फोटोवरुन तिला चांगलंच ट्रोल केलं जात आहे. खरंतर हा फोटो काहीसा जुना आहे, मात्र सध्या नेटिझन्सनी पुन्हा एकदा या फोटोवरुन चर्चेला उधाण आणलं आहे. या फोटोमध्ये शिल्पा तिचा मुलगा विवानसोबत रस्त्यावरुन चालताना दिसते आहे. मात्र, चर्चेचा विषय म्हणजे या फोटोत शिल्पाने फक्त कुर्ताच परिधान केलेला दिसतो आहे. कुर्त्याच्या खाली मात्र शिल्पाने काहीच घातलं नाहीये. नेमकं हेच कारण आहे ज्यामुळे पुन्हा एकदा शिल्पा जबरदस्त ट्रोल होते आहे. ‘मॅडमने कुर्ता तर घातलाय पण बहुधा घाईघाईत त्या पँट घालायला विसरल्या आहेत..’ अशा प्रकारच्या कमेंट्स नेटिझन्स या फोटोवर करत आहेत.

shilpa shetty trolling
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

कमेंट्सचा आणि टीकांचा पाऊस

शिल्पाच्या या फोटोवर आणि विशेषत: तिच्या या अजब गजब ड्रेसिंग स्टाईलमुळे, नेटिझन्सनी कमेंट्सचा आणि टिकांचा पाऊस पाडला आहे. कुणी पायजमा न घालण्यावरुन तिला टोमणा मारलाय, तर कुणी ‘इंडिया मैं कौनसा भी फॅशन चलता है’ म्हणत तिचं समर्थन केलं आहे. एक नजर टाकूया काही निवडक कमेंट्सवर…

Shilpa troll
सौजन्य- ibtimes

shilpa trollingसौजन्य- ibtimes

पाहा : ‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या आठव्या सीझनची झलक